वर्धा,
attack-with-a-sickle : साईबाबा यात्रा महोत्सवात कापड व्यावसायिकास विनाकारण शिवीगाळ केली. त्याला समजावत असतानाच व्यावसायिकाच्या मुलावर सत्तूरने वार करून जखमी केले. ही घटना आंजी मोठी येथे १४ रोजी घडली. चेतन वंजारी असे जखमीचे नाव असून याप्रकरणी पुरुषोत्तम वंजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंद्रशेखर पचारे (३३) रा. आंजी मोठी याच्याविरुद्ध खरांगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संग्रहित फोटो
आंजी मोठी येथील पुरुषोत्तम वंजारी हे मुलगा चेतन याच्यासोबत साईबाबा यात्रा महोत्सवात कापड दुकान लावून कापड विक्री करीत होते. दरम्यान, चंद्रशेखर पचारे हा दुकानासमोर आला आणि पुरुषोत्तम व त्याच्या मुलाला ण शिवीगाळ करू लागला. बापलेकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. दुकानात ग्राहक आहेत, तुम्ही घरी जा, असे म्हणताच चंद्रशेखरने चेतनच्या डोयावर सत्तूरने वार केला. यात चेतन रताच्या थारोळ्यात खाली पडताच वडील पुरुषोत्तम त्याला उचलायला गेला. चंद्रशेखरने पुरुषोत्तमवरही सत्तूर उगारला. मात्र, पुरुषोत्तमने वार चुकविला. या झटापटीत सत्तूर खाली पडत असताना पुरुषोत्तमच्या जबड्यावर पडल्याने ते सुद्धा जखमी झाले. चंद्रशेखर पचारे हा घटनास्थळावरून पसार झाला. जखमी चेतनला आंजी येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, जखम मोठी असल्याने त्याला सावंगी येथील रुग्णालयात हलविण्यात आले तर पुरुषोत्तम वंजारी यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी खरांगणा पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.