तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
jagadamba-institute : पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विनोद जनार्दन डंभारे व त्यांच्या पत्नी सुचिता विनोद डंभारे, सचिव डॉ. शितल वातीले यांच्या संयुक्त विद्यमाने केळापूर येथील जगदंबा देवी संस्थानात 6 डिसेंबरला जगदंबा अभियांत्रिकी विद्यालयाच्या नववर्षाच्या दिनदिर्शिकेचे विमोचन करण्यात आले.
या प्रसंगी विनोद डंभारे यांनी संस्थेची उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. मागील 15 ते 20 वर्षांत जगदंबा अभियांत्रिकी विद्यालयाचा बी. टेक, एम. टेक व पीएचडी या तिन्ही ठिकाणचा प्रवास पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच जगदंबा संस्थेचे कळंब येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात डिप्लोमा, बी.फार्म, डी.फार्म येथे होणाèया शैक्षणिक मदतीबद्दल आणि विद्यार्थ्यांना होणाèया मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी जगदंबा अभियांत्रीकी महाविद्यालयाचे यवतमाळ येथील प्रा. डॉ. सुमीत राऊत व प्रा. दीपक चरडे उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाला साथ दिल्याबद्दल डंभारे दाम्पत्याचे सचिव डॉ. शीतल यांनी आभार व्यक्त केले.