चोरी गेलेल्या एसप्लोसिव्ह डेटोनेटरसह चार आरोपी गजाआड

17 Dec 2025 18:16:46
वाशीम,
stolen detonators recovered, चोरी गेलेल्या एसप्लोसिव्ह डेटोनेटरसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ६९ हजार ४८८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिपोअ अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
 

 stolen detonators recovered, 
याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी बलराज राजु चौधरी रा. वाशीम यांनी तक्रार दिली की, त्यांचे सावरगाव बर्डे येथे परवानधारक मॅझीन आहे. त्यामध्ये विहीर खोदण्याकरीता ठेवण्यात आलेले डेटोनेटर अज्ञात चोरांनी चोरुन नेले. त्यावरुन वाशीम ग्रामीण पोलिस स्टेशनला अज्ञात चोराविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदर डेटोनेटरचा वापर देशविघातक कृत्यामध्ये होऊ शकतो. त्यासाठी या गुन्ह्यात वरिष्ठांनी जातीने लक्ष घालून सदर गुन्ह्याचा समातंर तपास करीता स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांना सदर गुन्ह्यातील माल हा सावरगाव बर्डे येथील एका शेतात लपवून ठेवला. अशा आशयाच्या गोपनीय माहितीवरुन स्थागुशा पोनि प्रदीप परदेशी यांनी त्वरीत एक पथक तयार करुन सावरगांव जिरे परीसरात रवाना केली. सावरगाव बर्डे शेत शिवारात सुनिल सुरेश कंकाळ रा. सावरगाव बर्डे यांचे शेताची पाहणी केली असता त्यांचे शेतात ठेवलेल्या सोयाबीन कुटाराच्या गंजीमध्ये लपवुन ठेवलेले ७ नायलॉनचे कट्टे पंचासमक्ष काढुन दिले. त्यामध्ये एसप्लोसिव्ह डेटोनेंटर ४०७६ नग किंमत १ लाख ६९ हजार ४८८ रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष हस्तगत करण्यात आाला. याप्रकरणी आरोपी सुनिल सुरेश कंकाळ, अमोल पांडुरंग बर्डे, दशरथ पांडुरंग बर्डे, गोविंदा उर्फ राजेश सोपान कड सर्व रा. सावरगाव बर्डे यांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शयता आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि योगेश धोत्रे, पोहवा गजानन झगरे, प्रविण शिरसाट, पोना ज्ञानेश्वर मात्रे, पोअंम अमोल इरतकर, संदिप दुतोंडे, संतोष वाघ, चपो
Powered By Sangraha 9.0