लखनऊ,
4th T20 match in Lucknow today भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज लखनौ येथील एकाना क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता खेळवण्यात येणार आहे. सध्या भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे आणि आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मालिकेवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करेल. एकाना खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते, मात्र सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या 175 धावा आहे.
अनेक संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात, कारण दुसऱ्या डावात परिस्थिती थोडी अवघड होऊ शकते. क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स आणि एडेन मार्कराम हे दक्षिण आफ्रिकेचे सर्वात मजबूत खेळाडू मानले जातात. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला, पण डी कॉकच्या धमाकेदार खेळीमुळे त्यांनी पुनरागमन केले. तिसऱ्या सामन्यात एडेन मार्करामने शानदार अर्धशतक झळकावले.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल प्रकृतीसंबंधी तणावामुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांपासून वगळण्यात आला आहे. त्याच्या जागी शाहबाज अहमदला संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद यांचा समावेश आहे. अंतिम Playing XI मध्ये सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांना स्थान दिले गेले आहे.