अकोला,
accepting-a-bribe : आंतरजातीय विवाहाचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी तक्रारदारास पाच हजार रुपये लाचेची मागणी करून पहिल्या टप्प्यात तीन हजार स्वीकारतांना अकोला एसीबीच्या पथकाने आरोपी खाजगी शिक्षक तसेच एजंट असणाऱ्या शैलेंद्र तुळशीराम बगाटे (४३) रा.कैलास टेकडी, खदान, अकोला याला बुधवार, १७ रोजी अटक केली असून त्याच्यावर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमच्या कलमानाव्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

तक्रारदार याचा सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला.शासनाच्या अनुदान योजना अंतर्गत या जोडप्याला ५० हजार रुपये अनुदान मिळते.त्यानुसार तक्रारदारांनी जिल्हा परिषद अकोला समाजकल्याण विभागात संपूर्ण कागदपत्रसह २ सप्टेंबर रोजी अर्ज केला मात्र कालावधी लोटून गेल्यावरती रक्कम मिळाली नसताना त्यांनी चौकशी केली असता या कार्यालयात उपस्थित असलेल्या शैलेंद्र बगाटे यांनी या कामाकरता पाच हजार रुपयाची मागणी केली पहिल्या टप्प्यात ३ हजार स्वीकारले. या संदर्भात तक्रारदाराला रक्कम द्यायची नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली अखेर १७ डिसेंबर शुक्रवारी बुधवारी शासकीय पंचासमक्ष जिल्हा परिषद अकोला समाजकल्याण विभागात लाच मागणी सापळा यशस्वी करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचिद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकुमार बाहकर पोलीस उपअधीक्षक, प्रवीण वेरूळकर पोलीस निरीक्षक, फौजदार शुद्धधन इंगळे, हवालदार राहुल इंगळे, दिगंबर जाधव, अविनाश पाचपोर, अर्चना घोडेस्वार, संदीप टाले, असलम शेख, गोपाल किरडे, चालक सलीम खान यांनी केली.