अमरावती महापालिकेत ६.७७ लाख मतदार

17 Dec 2025 21:36:32
अमरावती, 
amravati-municipal-corporation : महानगरपालिकेच्या ८७ जागेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली असून ६ लाखा ७७ हजार १८० मतदार आपल्या मतदानाचा हक्क निवडणुकीत बजावणार आहे. एकूण ७९७ मतदान केंद्र गठीत करण्यात आले आहे. लवकरच केंद्रनिहाय याद्या जाहीर होईल. ३६०० कर्मचार्‍यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती आयुक्त सौम्या शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
 
 

AMT 
 
 
 
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक १ जुलै २०२५ या दिवशी अस्तित्वात असलेली संबंधीत विधानसभेची मतदार यादी प्रभाग क्र. १ ते २२ मध्ये विभागून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली होती. या प्रारुप मतदार यादीवर २० ऑक्टोबर ते ३ डिसेंबर दरम्यान हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्या निकाली काढून प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या १५ डिसेंबरला प्रसिद्ध झाल्या आहे. या याद्या क्षेत्रीय झोन कार्यालयात तसेच अमरावती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे.
 
 
महापालिका निवडणुकीकरीता ७ निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे ७ ठिकाणी वेगवेगळे कार्यालये राहणार आहे. पहिले कार्यालय उत्तर झोन क्र.१ रामपुरी कँम्प अंतर्गत प्रभाग क्र.१, २, ५, दुसरे कार्यालय नवीन तहसील येथे राहणार असून प्रभाग क्र.३, ४, ७, तिसरे कार्यालय मध्य झोन क्र.२ राजापेठ येथे प्रभाग क्र.११, १२, १८, चौथे कार्यालय पूर्व झोन क्र.३ दस्तुरनगर येथे प्रभाग क्र.८, ९, १०, पाचवे कार्यालय महानगरपालिका शिक्षण विभाग अंबापेठ येथे राहणार असून प्रभाग क्र. ६, १३, १७, सहावे कार्यालय पश्चिम झोन क्र.५ जुने तहसील येथे राहील, प्रभाग क्र. १४, १५, १६, सातवे कार्यालय दक्षिण झोन क्र. ४ बडनेरा येथे राहणार असून त्या अंतर्गत प्रभाग क्र.१९, २०, २१, २२ आहे. जे प्रभाग ज्या निवडणूक निर्णय अधिकार्‍याच्या कार्यालया अंतर्गत येतात तेथेच त्या प्रभागातल्या उमेदवारांना अर्ज सादर करावा लागणार आहे.
 
 
उमेदवारला ९ लाख खर्च करण्याची मर्यादा आहे. आदर्श आचारसंहीतेचे पालन काटेकोर व्हावे, यासाठी व अन्य कामासाठी विविध समिती अंतिम मतदार यादीनूसार अमरावती महानगरपालिकेसाठी एकूण मतदार ६ लाख ७७ हजार ,१८० असून त्यापैकी स्त्री मतदार ३ लाख ३७ हजार ९३५ तर पुरुष मतदार ३ लाख ३९ हजार १७७ व इतर ६८ असे मतदार आहेत. मतदार यादीतील नाव शोधण्याकरीता राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळवार उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या संकेतस्थळवर भेट देऊन मतदार आपले नांव कोणत्या प्रभागात समाविष्ट आहे याची माहिती घेऊ शकतात. १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सांयकाळी ५.३० मतदान होईल. मतमोजणी १६ जानेवारीला सकाळी ८.३० वाजतापासून स्पोर्ट कॉम्प्लेक्स, नवसारी येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, सहाय्यक निवडणुक अधिकारी अक्षय निलंगे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0