भिकारी पकड माेहीम सुरु : पहिल्याच दिवशी 15 भिकारी ताब्यात

17 Dec 2025 20:41:54
अनिल कांबळे
नागपूर, 
beggar-apprehension-campaign : शहरात वाढत चाललेल्या भिक्षावृत्तीच्या गंभीर समस्येला आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइन 1098 व सीताबर्डी पाेलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीताबर्डी, धंताेली व पंचशील चाैक परिसरात भिकारी पकड माेहीम राबविण्यात आली. माेहिमेच्या पहिल्याच दिवशी बुधवारी 15 भिकाèयांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये 4 अल्पवयीन भिकारी मुलांचा समावेश आहे.
 
 
 
NGP
 
 
 
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्रत्येक चाैकात भिकाèयांची संख्या वाढली आहे. कार किंवा दुचाकीचालकांकडून पैसे मागण्यासाठीस भिकारी त्रस्त करुन साेडतात. काही अल्पवयीन मुले ाटक्या शर्टाने कारच्या काचा पुसतात आणि लगेच पैशांची मागणी करतात. काही गराेदर महिला चाैकात उभ्या राहून उपचार आणि प्रसुतीसाठी पैशांची मागणी करतात. तसेच काही भिकारी महिला कडेवर तान्हुले बाळ घेऊन बाळाच्या दुधासाठी पैशांची मागणी करतात. काही अल्पवयीन मुले हातात पेन घेऊन पेन विकत घेण्यासाठी हट्ट करुन पैशांची मागणी करताना दिसतात. सामान्य नागरिकांना हाेणारा मानसिक त्रास लक्षात घेता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे मुस्ताक पठाण आणि सीताबर्डीचे ठाणेदार विठ्ठलसिंह राजपूत यांच्या पुढाकाराने भिकारी पकड माेहीम राबविण्यात आली.
 
 
या माेहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी भीक मागताना आढळून आलेल्या चार बालकांसह एकूण 15 भिकारी (8 महिला व 3 पुरुष) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चाैकशीत संबंधित बालकांचा जाणीवपूर्वक भीक मागण्यासाठी वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले असून ही मुले शाेषणाच्या धाेक्यात असल्याचे निदर्शनास आले. त्या मुलांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाच्या अधीन असलेल्या बालगृहात दाखल करण्यात आले. तसेच संबंधित महिला व पुरुष भिकाèयांचे समुपदेशन करण्यात आले असून कायदेशीर कारवाईसाठी पाेलिसांनी नाेंद केली आहे. भीक मागणारे मुले आढळून आल्यास नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाइन- 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0