फलोत्पादन मंत्री गोगावले यांचा संत्रा बागायतदारांशी थेट संवाद!

17 Dec 2025 15:38:42
नागपूर,
Bharat Gogawale कळमेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कोहळी येथे सुषमा वानखडे व आरती पदमवार यांच्या संत्रा बागेस महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सदिच्छा भेट देऊन संत्रा बागायतदार व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.कुणाल पदमवार व आरती पदमवार यांनी मंत्री महोदयांचे स्वागत केले. वानखडे परिवाराच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
anshul
 
 
 
 
गोगावले यांनी संत्रा बागायतदारांच्या समस्या जाणून घेत संत्रा ग्रेडिंग व पॅकिंग युनिट, प्रोसेसिंग युनिटची आवश्यकता तसेच संत्रा निर्यातीच्या संधी यावर सखोल चर्चा केली Bharat Gogawale कार्यक्रमाचे संचालन उप कृषी अधिकारी उज्ज्वल डाखोळे यांनी केले.दौरा यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी दीपाली कुंभार, उप कृषी अधिकारी उज्ज्वल डाखोळे, सहाय्यक कृषी अधिकारी विनोद डाहाट, रोशन नन्हे, अंकुश कंकाळे, पवन दुपारे, शशिकांत इंगोले, प्रेमराज फलके, युक्ता सरप व मोनाली कुंभारे यांनी विशेष सहकार्य केलेयावेळी वसंतराव नाईक राज्य स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष नीलेश हेलोंडे पाटील, कळमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण भिंगारे, एनआयटी नागपूरचे विश्वस्त संदीप इटकेलवार, ग्रामपंचायत कोहळीच्या सरपंच बेबी शेळके, उपसरपंच देवकांत वानखडे, अंकुश माने, महाऑरेंजचे संचालक मनोज जवंजाळ, डॉ. राजकुमार सोनकर, विभागीय कृषी सहसंचालक (नागपूर विभाग) उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, उपविभागीय कृषी अधिकारी बळीराम सातपुते, तालुका कृषी अधिकारी दीपाली कुंभार यांच्यासह संत्रा बागायतदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0