समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून हिरव्या हायड्रोजनची निर्मिती!

17 Dec 2025 14:46:30
बीजिंग,
China has developed innovative technology चीनने जागतिक ऊर्जा आणि पाणी संकटावर मात करण्यासाठी एक अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेडोंग प्रांतातील रिझाओ शहरात उभा केलेल्या अत्याधुनिक कारखान्यात समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य अल्ट्रा-शुद्ध पाणी आणि हिरव्या हायड्रोजनमध्ये केले जाते. या प्रक्रियेसाठी पारंपारिक वीज किंवा इंधनावर अवलंबून राहण्याची गरज नाही; कारखान्याची ऊर्जा जवळच्या स्टील आणि पेट्रोकेमिकल प्लांटमधून मिळणाऱ्या टाकाऊ उष्णतेपासून तयार केली जाते, जी आधी कचरा म्हणून फेकली जात होती. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी घट झाली आहे.
 
 
 
China
तज्ज्ञ या तंत्रज्ञानाला "एक इनपुट, तीन आउटपुट" मॉडेल म्हणत आहेत. यात इनपुट म्हणून समुद्राचे खारे पाणी आणि औद्योगिक कचरा उष्णता वापरली जाते, तर आउटपुटमध्ये तीन उपयोगी उत्पादन मिळतात. दरवर्षी अंदाजे ४५० घनमीटर स्वच्छ पिण्याचे पाणी तयार होते, जे घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी उपयुक्त आहे. दुसरे, दरवर्षी अंदाजे १९२,००० घनमीटर हिरव्या हायड्रोजनचे उत्पादन केले जाते, जे स्वच्छ इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. तिसरे, सागरी रसायने तयार करण्यासाठी दरवर्षी अंदाजे ३५० टन ब्राइन मिळते.
 
या प्रक्रियेत काहीही वाया जात नाही आणि प्रत्येक उत्पादनाचा पुनर्वापर केला जातो, ज्यामुळे पर्यावरणावर अतिरिक्त भार पडत नाही. खर्चाच्या बाबतीत, समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी प्रति घनमीटर फक्त २ युआन (अंदाजे २४ रुपये) लागतात. त्यामुळे ही तंत्रज्ञान अमेरिका आणि सौदी अरेबियामधील प्रगत तंत्रज्ञानापेक्षाही श्रेष्ठ मानली जाते. हिरव्या हायड्रोजनचे उत्पादन इतके मोठे आहे की अंदाजे १०० बसेस ३,८०० किलोमीटर अंतरावरील प्रवासासाठी ऊर्जा प्राप्त करू शकतात. समुद्राने वेढलेल्या देशांसाठी ही तंत्रज्ञान भविष्यातील पाणी आणि स्वच्छ ऊर्जा संकटांवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकते.
Powered By Sangraha 9.0