नागपूर,
k-sanjaymurt : भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक के. संजयमूर्ती यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला भेट दिली व भारतीय राजस्व सेवा अधिकाèयांच्या 79 व्या तुकडीचे स्वागत केले.
नवोदित 182 भारतीय महसूल सेवा प्रशिक्षणार्थी अधिकाèयांना संबोधित करताना त्यांनी नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून आपल्या घटनात्मक जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. जटिल करविषय हाताळताना कायदेशीर पालनासोबत व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी निरंतर शिक्षण, शैक्षणिक संस्थांशी सहकार्य व क्षमता विकासयावर भर दिला. संशोधन अनुदानांवरील जीएसटी तसेच नवोन्मेष व स्टार्ट-अप्सविषयी त्यांनी उदाहरणे दिली.
के. संजयमूर्ती यांनी महालेखाकार (लेखा व हक्कदारी)-2 कार्यालयाला भेट दिली. महालेखाकार सुहासिनी गोतमारे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी लेखा परीक्षण, लेखा कार्यालय, भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभागांंतर्गत प्रशिक्षण संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. पेन्शन विभागांना भेट दिली व पेन्शन प्रकरणांच्या डिजिटायझेशनवर भर दिला. वरिष्ठ अधिकाèयांशी चर्चा केली. प्रशिक्षण सुविधा व पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. सर्व सेवा संघटनांच्या कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधला. आपल्या भेटीदरम्यान, सीएजी यांनी रोपटे लावले. त्यांच्या या भेटीमुळे सीएजी यांची पारदर्शकता, जबाबदारी व संस्थात्मकक्षमतेच्या बळकटीकरणाबाबतची वचनबद्धता अधोरेखित झाली.