नवी दिल्ली,
ipl squad rcb 2026 गेल्या हंगामातील विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएल २०२६ च्या आधी १६ नोव्हेंबर रोजी अबू धाबी येथे झालेल्या मिनी लिलावात काही मोठ्या आणि धडकीभरवणाऱ्या खेळाडूंची खरेदी केली. संघाने १६.४० कोटी रुपयांचा बजेट वापरून लिलावात सहभाग घेतला. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने १६ कोटी खर्च करून दोन परदेशी खेळाडूंसह आठ महत्त्वपूर्ण खेळाडूंना संघात समाविष्ट केले.
२ कोटींच्या बेस प्राइस असलेल्या व्यंकटेश अय्यरला आरसीबीने ७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले, तर मंगेश यादवला ५.२ कोटी रुपये देऊन संघात घेतले. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जैकब डफी देखील मूळ किंमत २ कोटी रुपयांमध्ये आरसीबीने खरेदी केला. आरसीबीने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादीत रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जॅकब बेथेल, जोश हॅजलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान थुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह आणि सुयश शर्मा यांचा समावेश आहे.
आरसीबीचा संपूर्ण संघ आता रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जॅकब बेथेल, जोश हॅजलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल, विहान मल्होत्रा आणि कनिष्क चौहान असे आहे.
आयपीएल २०२६ साठी आरसीबीची संभाव्य Playing XI अशी असू शकते: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, व्यंकटेश अय्यर, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल आणि जोश हॅजलवूड. या लिलावात एकूण ३६९ खेळाडूंवर बोली लावण्यात आली, ज्यापैकी ७७ खेळाडूंची विक्री झाली. विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये ४८ भारतीय आणि २९ परदेशी खेळाडूंचा समावेश होता. आयपीएलमधील सर्व संघांनी एकत्रितपणे २१५.४५ कोटी रुपये खर्च केले, मात्र या रकमेपैकी सुमारे ४०% रक्कम फक्त पाच प्रमुख खेळाडूंवर खर्च झाली.