नागपूर,
Lal Singh Academy नंदनवन बास्केटबॉल मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय रोलर बास्केटबॉल स्पर्धेत लाल सिंग स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. या स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे १५० ते २०० खेळाडूंनी सहभाग घेतला. संजय स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल (शिवरी नगर), सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल, नारायण ई-टेक्नो स्कूल यांसह अनेक सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. सर्व सामने अत्यंत रोमांचक आणि चुरशीचे झाले.
लाल सिंग स्पोर्ट्स अकादमीकडून निवड झालेल्या खेळाडूंमध्ये पुनीत गाजरे, श्रीमय इंगळे, साईश कडू, सुरेश सोनुले, ओम वाकुलकर, इम्रान शेख, साई चोपकर, करुण्य हिरेकर, ओम दंडे, आदित्य दोडसे, हिमांक डोंगरे आणि नेहल महाजन यांचा समावेश आहे. Lal Singh Academy हे सर्व खेळाडू येत्या ७ व्या राज्यस्तरीय रोलर बास्केटबॉल स्पर्धेत नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा २० व २१ डिसेंबर २०२५ रोजी बाबा नगर स्केटिंग ग्राउंड, नांदेड येथे होणार आहे.
यावेळी महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष अंबुलकर, क्रीडा समन्वयक किरण यादव (पूर्व नागपूर) तसेच क्रीडा समितीचे संघटक हरीश चौबे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. Lal Singh Academy या यशाचे श्रेय खेळाडूंनी आपले प्रशिक्षक लालसिंग यादव आणि नीलेश वाघमारे यांना दिले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालील नियमित प्रशिक्षणामुळेच ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
सौजन्य: लाल सिंग, संपर्क मित्र