पोफाळी परिसरात बिबट्याची दहशत

17 Dec 2025 20:26:52
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
leopard-terror : तालुक्यातील पोफाळी परिसरात बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मतखंड परिसरात शेतकèयांच्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. पोफाळी गावाजवळ बिबट्या दिसल्याची चर्चा असून, कळमुला, नागवाडी, पाथरवाडी, शेनंद, सावरगाव बंगला या गावांमध्येही बिबट्याची दहशत वाढल्याचे सांगितले जात आहे.
 

;K 
 
रबी हंगामासाठी शेतकèयांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. त्यातच या काळात बिबट्याच्या वावरामुळे भीती वाढली आहे. पोफाळी गावाजवळ नागरिकांना बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
 
 
वनविभागाच्या वतीने नागरिकांना रात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दवंडीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, एकट्याने शेतात जाऊ नये तसेच कोणताही संशयास्पद वावर आढळल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0