मोसीकॉलच्या १० एकर जागेत बाजार उभारा

17 Dec 2025 10:17:21
अमरावती,
land in mosicol शहरातील चौधरी चौक ते विलास नगर रोडवर डाव्या बाजूला असलेल्या मध्यवस्तीत विलास नगर लगत शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य तेलबिया, व्यापार व औद्योगिक महामंडळाची (मोसीकॉल) अंदाजे २२ ते २४ एकर विस्तीर्ण जागा उपलब्ध आहे. यापैकी १० एकर जागेवर वाढत्या अमरावती शहराची गरज लक्षात घेऊन नवीन बाजार तयार करण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.
 
 

सुनील देशमुख  
 
 
महामंडळ आता या जागेची जसे आहे तसे, जिथे आहे तिथे, जे काही आहे ते आणि कोणताही परतावा/दावा नाही या तत्त्वावर विक्री करणार असल्याची निविदा नुकतीच प्रकाशित झाली आहे. शहरांमध्ये गेल्या ७०- ८० वर्षांपासून इतवारा बाजार व शुक्रवारी बाजार असे दोनच पारंपारिक बाजाराच्या जागा निश्चित करण्यात आलेले आहेत. इतक्या वर्षात अमरावती शहराचा कैक पटीने वाढलेला विस्तीर्ण व्याप व लोकसंख्येच्या दृष्टीने हे दोन्ही बाजार अपुरे असून सार्वजनिक वापराच्या नवीन बाजाराची आवश्यकता आहे. असे असताना शासनाचा उपक्रम असलेल्या महामंडळाच्या मालकीची ही जागा पूर्णतः विक्री न करता यातील किमान १० एकर जागा महानगरपालिकेद्वारे विकास योजनेमध्ये आरक्षित करून चौधरी चौक, कॉटन मार्केट विलास नगर रोड, गाडगेनगर या रस्त्यावरील अनधिकृत भाजीपाला विक्रेते व अन्य हॉकर्स यांच्यासाठी येथे नव्याने सुसज्ज बाजाराचे निर्माण करावे. शहरात रस्तोरस्ती बोकाळलेल्या अनधिकृत हॉकर्सची गर्दी कमी करून वाहतूक व्यवस्था सुधारण्याची सुद्धा ही नामी संधी आहे. परंतु, लोकप्रतिनिधी शहराच्या विकासाची बुज राखून या दिशेने प्रयत्न करणार काय हा खरा सवाल आहे. नव्हे तर हे त्यांचे जनतेप्रती असलेले उत्तरदायित्वच आहे. पण त्यांचे प्राधान्यक्रम वेगळेच असल्याने ते त्यातच मश्गूल असल्याचे चित्र आहे. एकेकाळी शहराच्या मध्यवस्तीतील हा भाग आहे. येथे असलेल्या कापूस प्रक्रिया, जिनिंग प्रेसिंग इत्यादी उद्योगामुळे भरभराटीला आलेला होता येथे मोसीकॉल, शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्था, तिवसा जीनिंग फॅ क्टरी, एदलजी फ्रॉमजी दोटीवाला जिनिंग फॅ क्टरी, नेमानी जिनिंग प्रेसिंग फॅ क्टरी, लढ्ढा जिनिंग या उद्योगामुळे कापूस प्रक्रिया क्षेत्रात सुवर्णकाळ गाजवलेला हा परिसर आहे. परंतु कालौघात हे उद्योग डबघाईस घेऊन बहुतांश उद्योग आता बंद पडले आहे.land in mosicol मागे शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीच्या जागेचे सुद्धा असेच व्यावसायिकरण करून ही संपूर्ण जागा अनेक बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या घशात घालून आपले उखळ पांढरे करून घेतल्याची उदाहरणे आहेत. आता अंदाजे २५ एकराचा हा मोठा भूखंड जो की शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या महामंडळाच्या मालकीचा असून तो आता विक्री करून तेथे व्यावसायिक स्वरूपाचे बांधकाम करण्याचे प्रयोजन असल्याचे निश्चित झालेले आहे. दिसली जागा की त्याची विक्री करायची किंवा त्याचा आपल्या व्यापारी मित्रमंडळींना विक्री करून व्यावसायिक लाभ मिळवून द्यायचा याची जणू शहरात लोकप्रतिनिधींमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. नेहरू मैदान येथे प्रस्तावित व्यापारी संकुल व अन्य सरकारी जागा व्यावसायिकांच्या घशात घालण्याच्या प्रयत्न होत असल्याचे अमरावतीकर अनुभवत आहेत. मोसीकॉलच्या १० एकर जागेवर बाजार उभारा अशी मागणी डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0