अल्पवयीन मुलीची छेड, युवकावर गुन्हा दाखल

17 Dec 2025 17:47:23
मानोरा,
Manora police case पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या एका गावातील नववी वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी यांची छेड काढल्या प्रकरणी पीडित मुलीने मानोरा पोलिस स्टेशनला १५ डिसेंबर ला दिलेल्या फिर्यादी वरून एका युवका विरुद्ध मानोरा पोलिसांनी विविध कलमा नुसार गुन्हे दाखल करून पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले आहे.
 

Minor girl harassment, Sexual harassment minor, Manora police case, 
पोलिस सूत्राकडून प्राप्त माहिती नुसार एका गावातील शाळेत नववी वर्गात शाळा शिकणारी अल्पवयीन मुलगी घरून शाळेत जाण्यासाठी निघाली. परंतु, ती शाळेत शाळेत नसल्याने वर्ग शिक्षक यांनी पालकांना फोन केले की तुमची मुलगी शाळेत आली नाही. पालकांनी शोध घेतला असता सदर अल्पवयीन मुलीने गावातील एका युवकांने छेड काढल्याची माहिती पालकांना दिली. पीडित मुलगीने १५ डिसेंबर ला मानोरा पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने गावातील एका युवका विरोधात कलम ७४,७५,७८,३३३, ११५ (२), ३५१(२), (३), बीएनएस पोस्को अंतर्गत ८,१२ नुसार गुन्हा दाखल करून घटनेचा तपास प्रभारी ठाणेदार राम सरोदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत रामटेके तपास करीत आहे.
Powered By Sangraha 9.0