मुंबईकरांचा श्वास होणार मोकळा

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
विशेष
प्रा. सुखदेव बखळे
mumbai metro मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहेच; त्याचबरोबर ते जागतिक पातळीवरील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका आहे. मुंबईच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू यांसारख्या मोठमोठ्या प्रकल्पांना गती दिली. या प्रकल्पांमुळे मुंबईचे कनेक्टिव्हिटी नेटवर्क मजबूत झाले आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्यातील अंतर कमी झाले आहे. मुंबई आणि नवी मुंबई ही दोन महत्त्वाची ठिकाणे अटल सेतूमुळे जवळ आली. या दोन महत्त्वाच्या शहरांबरोबरच आता नवीन तिसèया मुंबईच्या निर्मितीचीही तयारी सुरू झाली आहे. ही तिसरी मुंबई फ्युच्युरिस्टिक स्वरूपाची असणार आहे. अशा या दोन्ही मुंबईतील विविध प्रकारच्या विकास प्रकल्पांमुळे मुंबईच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती मिळत आहे. मुंबईच्या विकास आराखड्याला सरकारने 2018 मध्ये मान्यता दिली. मुंबईच्या विस्ताराचा सखोल विचार करून मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन इथल्या नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करणे, वाहतूक व्यवस्था सुधारणे, शहरातील नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे, जमिनीचा वापर नियोजित पद्धतीने करणे आदी गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
 
 
 
मुंबई मेट्रो
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मुंबई इन 59 मिनिट्स’ या संकल्पनेनुसार मुंबईतील कोणत्याही भागातून 59 मिनिटांमध्ये दुसèया भागात पोहोचता यावे, यासाठी मेट्रो, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक प्रकल्प राबविले जात आहेत. लवकरच मेट्रोच्या तीन नवीन लाईन्स सुरू होण्याची अपेक्षा आहे तसेच दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मुंबईतील मंडाले येथील मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशातील मेट्रो प्रकल्पांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मुंबईच्या सर्वांगीण आणि आधुनिक विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. यासाठी मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांहून अधिक निधीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई मेट्रो प्रकल्प, मुंबई रेल्वे मार्ग विस्तार, लोकल रेल्वे नेटवर्क, नवीन रेल्वे कॉरिडॉर आणि मुंबई उच्च न्यायालय नवीन संकुलाचा समावेश आहे. याचबरोबर मुंबईला लागून असलेली ठाणे रिंग मेट्रो, नवी मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड तसेच ठाणे ते नवी मुंबई विमानतळ यादरम्यान उभारण्यात येणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग या योजनांमुळे मुंबईत येणारी आणि मुंबईतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था अधिक जलद होणार आहे. फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा 3 आणि 3ए अंतर्गत मुंबईसाठी 268 नवीन एसी रेल्वे गाड्या खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.mumbai metro या ट्रेन मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्या असणार आहेत तसेच या नवीन एसी गाड्यांसाठी प्रवाशांना जादा दरदेखील द्यावा लागणार नाही. टप्प्याटप्प्याने जुन्या रेल्वे गाड्या हटवून त्या जागी नवीन एसी रेल्वे गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
2008 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पृष्ठभूमीवर सरकारने मुंबईत सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची घोषणा केली होती. टप्प्याटप्प्याने व्यापक स्वरूपात मुंबईतील सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला होता. 2018 मध्ये सीसीटीव्हींची संख्या वाढवून 980 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. त्याचबरोबर डायल 100 या प्रकल्पाला प्राधान्य देत मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची पावले उचलली. 2018 नंतर 2019 मध्ये सीसीटीव्हीच्या यंत्रणेचा आणखी विस्तार करत मुंबईत साधारण एकूण 10 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला गेला. पूर्वीच्या 5 हजार सीसीटीव्ही कॅमेèयांच्या संख्येत आणखी 5625 सीसीटीव्हींची वाढ करून त्यासाठी 323.23 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली गेली. वाढत्या इंटरनेट आणि ‘सोशल मीडिया’च्या वापरामुळे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याच्या पृष्ठभूमीवर शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र सायबर गुन्हे तपास आणि प्रतिबंध कक्ष स्थापन करण्याचा निर्णय 2017 मध्ये घेण्यात आला होता. मुंबई पोलिस दलांतर्गत मुंबईतील पाच प्रादेशिक विभागांमध्ये तब्बल 93 पोलिस ठाणी असून बीकेसी भागामध्ये स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे आहे. या स्पेशल सायबर कक्षातून सायबर गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे. सरकारने या यंत्रणेत आता मोठ्या प्रमाणात सुधारणा करून पोलिसांना अत्याधुनिका यंत्रणा, लॅब उपलब्ध करून दिली आहे. त्यातून मुंबई पोलिस आर्थिक सायबर क्राईमवर बारीक लक्ष ठेवून आहे.
मुंबई आणि मुंबईकरांचे आरोग्य स्वास्थ्य अबाधित राहावे, यासाठी फडणवीस सरकारने 2018 मध्ये मुंबईसाठी मोबाईल मेडिकल युनिट सेवा सुरू केली होती. या माध्यमातून प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्स, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्टची सुविधा पुरविण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य सेवांपासून वंचित लोकांना प्रत्येक वॉर्ड आणि वस्तीसाठी प्रतिबंधात्मक उपचारात्मक आरोग्य सेवा सुरू करण्यात आली होती. या मोबाईल मेडिकल युनिटच्या माध्यमातून कुटुंब नियोजन, प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चात माता आणि बालसंगोपन, लसीकरण, साथरोग नियंत्रण, समुपदेशन आदी राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जात होती. मेट्रो लाईन 2ए, 2बी, 3, 4, 5, 6, 7 अशा विविध मार्गावरील लाईन्स पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. यामुळे मुंबई कनेक्टिव्हिटी लेव्हल वाढली आहे. त्याचबरोबर या मेट्रो मार्गांमुळे रस्त्यावरील ट्रॅफिक कमी होऊन प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाला मंजुरी, परवानग्या मिळाल्याने हा रस्ता बहुतांश पूर्ण झाला आहे. कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सागरी सेतू यांना जोडणाèया उत्तर वाहिनी पुलाचे उद्घाटन या आधीच झाले. कोस्टल रोडमुळे मुंबईच्या लौकिकात तर भर पडली आहे; त्याचबरोबर या रस्त्यामुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये कनेक्टिव्हिटी तयार झाली आहे.
एव्हाना मुंबईच्या पूर्व-पश्चिम वाहतूक मार्गावर निर्माण होणाèया रहदारीच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी बांधण्यात आलेल्या सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर दक्षिण आशियातील पहिला केबल स्टेड ब्रीज उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील अत्यंत गर्दीच्या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. या लिंक रोडमुळे वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील ट्रॅफिक कमी होणार आहे तसेच यामुळे वाहनचालकांचा 15 ते 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. मुंबईतील बीडीडी चाळ, पत्राचाळ, धारावी झोपडपट्टी आणि इतर वसाहतींच्या पुनर्विकासाला गती देण्याचे काम सरकारने केले. वरळी बीडीडी चाळीतील हजारो घरांच्या पुनर्वसनाचे काम प्रगतिपथावर आहे. याशिवाय नायगाव, जोशी मार्ग, गोरेगाव आणि इतर भागांमध्येही पुनर्वसन प्रकल्प वेगाने सुरू आहेत. धारावी पुनर्वसन हा मुंबईच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये हजारो उद्योग सुरू असून या भागाचा पुनर्विकास करून आधुनिक रूप देण्याचा उपक्रम फडणवीस यांच्या काळात सुरू झाला आहे. येणाèया काही वर्षांमध्ये धारावी स्लम फ्री मुंबईकडे वाटचाल करेल आणि येथे सुमारे 10 लाख लोकांना चांगली घरे तसेच विविध सुविधांचा लाभ मिळेल. धारावीचे झोपडपट्टीच्या रूपातून अधिकृत, नियोजित भागात पुनर्वसन होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले. बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या सहापैकी पाच एक्झिट पूर्ण झाले आहेत. राहिलेला एक मार्गही या महिन्यात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. एकंदरीत विकसित, सुरक्षित, देखणी मुंबई उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
(लेखक अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)
---