3 पिस्तूलसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

17 Dec 2025 15:29:13
अनिल कांबळे

नागपूर,
illegal weapons seizure गुन्हे शाखा पाेलिसांनी पाचपावली परिसरातील भीमतरत्ननगर झाेपडपट्टी येथे गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका आराेपीला अटक करून त्याच्या घरातून तब्बल 5 लाख 51 हजार 700 रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा, जिवंत काडतुसे आणि माेठ्या प्रमाणात प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करणाèया टाेळीचे धागेदाेरे उघड झाले आहेत.
 


ijk 
पाचपावली पाेलिस ठाणे हद्दीतील भीमतरत्ननगर येथे राहणाèया राहुल रत्नदीप मासुरकर (22) याच्या घरावर पाेलिसांनी छापा टाकला. दाेन पंचांसमक्ष घेण्यात आलेल्या घरझडतीत आराेपीकडे तीन देशी बनावटीचे अग्नीशस्त्रे (पिस्टल) आणि एक मॅगझीन, 12 बाेरचे 2 आणि 11 पितळी जिवंत काडतूस मिळून आले. याव्यतिरिक्त एक चाकू, ायटर आणि स्टीलची तलवार यांसारखी घातक शस्त्रेही पाेलिसांनी कारवाई हस्तगत केली. शस्त्रासाेबतच या घरात 2 लाख 53 हजार रुपयांचा 10 किलाे 120 ग्रॅम गांजा, 1 लाख 35 हजार रुपयांचा माेबाईल आणि 3 हजार 500 रुपयांची राेख असा एकूण 5 लाख 51 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
एक अटकेत, तीन फरार
कारवाईनंतर illegal weapons seizure  पाेलिसांनी राहुल मासुरकर याला अटक केली. तर शस्त्र, गांजाच्या साठ्याच्या संबंधित असलेले राहुलचे साथिदार इरान खान उफर् गजनी, इरशाद उफर् इच्छू आणि बबलू खान यांच्याविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. हे तिन्ही आराेपी फरार असून पाेलिस त्यांचा शाेध घेत आहेत.
 
 
पिस्तूल शहरात येतात कुठून ?
गेल्या काही दिवसांत शहरात अनेक गुन्हेगारांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक देशी बनावटचीच्या पिस्तूलांचा समावेश आहे. अन्य राज्यातील अग्नीशस्त्र विकणाèया अनेक टाेळ्या सक्रिय झाल्याची माहिती समाेर आली आहे. मात्र, गुन्हेगारांवर हायटेक वाॅच करणारी गुन्हे शाखा नेमके काय काम करतेय,या बाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0