कारंजा (घा.),
niti-aayog : जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. या तालुयात विविध प्रकारच्या ३९ निर्देशांकावर कामे केली जात आहे. तालुयासाठी निती आयोगाच्या वतीने नियुत करण्यात आलेले केंद्रीय प्रभारी अधिकारी तथा केंद्र सरकारचे निवृत्तीवेतन संचालक रवीकिरण उबाळे यांनी कामांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार, कारंजाचे गट विकास अधिकारी प्रवीण देशमुख तसेच विविध विभागाचे कार्यालय प्रमुख आणि कारंजा तालुयातील तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली कारंजा तालुयामध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तालुयात विविध विभागाकडील ३९ निर्देशांक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सदर विषय व कार्यक्रमाच्या प्रभावी व यशस्वी अंमलबजावणीसाठी नीती आयोगाकडून देशातील २०० तालुयात केंद्र शासनातील उच्चपदस्थ अधिकार्याची केंद्रीय प्रभारी म्हणून नियुती करण्यात आलेली आहे.
कारंजा तालुयासाठी भारत सरकारच्या निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागांतर्गत निवृत्ती वेतन संचालक रवीकिरण उबाळे यांची नियुती करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निर्देशांकाबाबत सविस्तर आढावा घेतला. कारंजा तालुयात झालेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यत केले तसेच ज्या निर्देशांकामध्ये प्रगती कमी दिसून येते याबाबत चर्चा करून सुधारणा कशी होईल, याबाबत काम करण्याबाबत निर्देश दिले.
आकांक्षित तालुयातील निर्देशांक सुधारण्यासाठी विशेष लक्ष देऊन कारंजा हा आकांक्षितमधून विकसित तालुयात समावेश होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार मागीलवर्षी कारंजा तालुयाची निवड डेल्टा रॅकिंगमध्ये झालेली आहे. त्यासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.