झायरा वसीमचा संताप.. कुमारांनी बिनशर्त माफी मागावी

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
मुंबई
Nitish Kumar hijab incident बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान एका महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या कथित घटनेवर माजी अभिनेत्री झायरा वसीम हिने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना झायराने या घटनेला महिलांच्या सन्मानाचा अपमान ठरवत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संबंधित महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
 

Nitish Kumar hijab incident 
झायरा वसीमने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, कोणत्याही महिलेची मर्यादा आणि प्रतिष्ठा ही खेळण्याची गोष्ट नाही, विशेषतः सार्वजनिक मंचावर तर अजिबातच नाही. एक मुस्लिम महिला म्हणून दुसऱ्या महिलेचा नकाब इतक्या बेफिकिरीने ओढला जाताना पाहणे आणि त्यावेळी चेहऱ्यावर असलेली निष्काळजी स्मितरेषा अत्यंत संतापजनक असल्याचे तिने नमूद केले. सत्तेला मर्यादा ओलांडण्याची मुभा नसते, असे सांगत झायराने नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागावी, अशी स्पष्ट भूमिका घेतली.
 
 
ही घटना पटना Nitish Kumar hijab incident  येथील ‘संवाद’ भवनात आयोजित एका अधिकृत कार्यक्रमात घडली. या कार्यक्रमात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे एक हजार आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रांचे वितरण सुरू होते. याच वेळी नुसरत परवीन या तरुण महिला डॉक्टर नियुक्तीपत्र घेण्यासाठी मंचावर आल्या. त्यांनी हिजाबद्वारे चेहरा झाकलेला होता. यावर मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज झाल्याचे दिसून आले आणि त्यांनी पुढे झुकून नुसरत परवीन यांचा हिजाब खाली ओढत “हे काय आहे?” असे उद्गार काढल्याचे सांगितले जाते.या प्रकारामुळे नुसरत परवीन घाबरल्याचे स्पष्टपणे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एका अधिकाऱ्याने तात्काळ त्यांना मंचावरून खाली नेले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभे असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत मुख्यमंत्र्यांची आस्तीन ओढल्याचे दृश्य समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने पसरल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
 
दरम्यान, झायरा Nitish Kumar hijab incident वसीमबाबत सांगायचे झाल्यास, तिने ‘दंगल’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांमधील भूमिकांमुळे अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोनाली बोस दिग्दर्शित ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटात ती शेवटची झळकली होती. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. चित्रपटसृष्टी तिच्या वैयक्तिक श्रद्धा आणि मूल्यांशी सुसंगत नसल्याचे तिने त्यावेळी सांगितले होते.याच वर्षाच्या सुरुवातीला झायराने आपल्या विवाहाची घोषणा करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर निकाहचे फोटो शेअर केले होते. “कुबूल है” असे कॅप्शन देत तिने नव्या आयुष्याची सुरुवात झाल्याची माहिती दिली होती.पटना येथील घटनेवरून आता राजकीय आणि सामाजिक पातळीवरही चर्चा रंगली असून, सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी महिलांच्या सन्मानाबाबत अधिक संवेदनशील राहावे, अशी मागणी जोर धरत आहे.