पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली सेलू पंसच्या इमारतीची पाहणी

17 Dec 2025 19:42:05
सेलू,
Pankaj Bhoyar : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सेलू येथे साकारत असलेल्या पंचायत समितीच्या नवीन इमरातीची पाहणी केली. यावेळी पंसचे गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, उपअभियंता विवेक राठोड, कनिष्ठ अभियंता सागर कथले आदी उपस्थित होते.
 
 
 
KM
 
 
 
सेलू पंचायत समितीची इमारत जीर्ण झाली होती. पावसाळ्याता अनेक ठिकाणी पाणी गळत असल्याने कामकाजाचा खेळखंडोबा होत होता. इमारत जुनी असल्याने प्रशासनिकदृष्ट्या कामकाज करताना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. भोयर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून पंसच्या नवीन इमारत बांधकामासाठी १२.४६ कोटी रुपयांचा निधी आणला. तीन मजली प्रशासकीय इमारतीला लिफ्ट, सोलर, पावर बॅकअप, आधुनिक फर्निचर, अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र कक्ष, मिटिंग हॉल, कॉन्फरंस हॉल राहणार आहे. या बांधकामाची पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मंगळवारी पाहणी केली. गुणवत्तापूर्ण काम करण्यासोबतच मार्च पूर्वी काम पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना केली.
 
 
यावेळी पंसचे माजी सभापती अशोक मुडे, पंसचे माजी सदस्य अशोक कलोडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल खोडे, घोराडच्या माजी सरपंच ज्योती घंगारे, विलास वरटकर, दिनेश कामिनकर, राजू लिडबे, विकास मोटमवार व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
वसाहतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
 
 
पंस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासाची व्यवस्था आवश्यक आहे. तथापि, सभापती, अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पंस परिसरात वसाहत निर्माण करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी संबंधित अधिकार्‍यांना केली.
Powered By Sangraha 9.0