पुणे,
newborn in garbage पिंपळे निलख परिसरात एका दिवसाचं मृत स्त्री अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतलं असून, पुढील तपासासाठी शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
प्राथमिक माहिती नुसार, नागरिकांनी अज्ञात महिलेकडून कचऱ्यात अर्भक फेकल्याची माहिती पोलिसांना दिली. ही घटना समोर येताच परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून, स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.सांगवी पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला असून, मृत अर्भक कुणी आणि कोणत्या कारणासाठी फेकलं, याचा शोध घेतला जात आहे.
अज्ञात व्यक्तीविरोधात newborn in garbage गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.विशेष म्हणजे, ही घटना समाजात मुलगी नकोशी असल्याची मानसिकता अजूनही कायम असल्याचे अधोरेखित करते. मुलांनाच महत्त्व दिलं जात असल्याचे वांशिक आणि सामाजिक समजूतदारपणावर प्रश्न उपस्थित करीत आहे. समाजातील ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता या घटनेतून स्पष्ट होते.स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे माहिती देऊन घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांच्या तपासात सहकार्य केले आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करत असून, अर्भक फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.