अकोला,
strike-warning : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अधिकारी व कर्मचारी यांचे विना चौकशी होणारे निलंबन व शासानाकडे प्रलंबित विभागाच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी महसूल अधिकारी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना बुधवार, १७ रोजी निवेदन देण्यात आले.मागण्या मान्य न झाल्यास शुक्रवार, १९ डिसेंबर पासून कामबंद आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत.त्यानुसार निवेदन जिल्हा प्रशासनास सादर करून महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. पुढील आंदोलनात्मक कार्यक्रमाबाबत संघटनेचे निर्देश प्राप्त होताच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.प्रलंबित मागण्या वर तात्काळ कार्यवाही व्हावी अन्यथा शुक्रवार पासून कामबंद आंदोलनाचा ईशारा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यानी दिला.यावेळी उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर वैभव फरताडे समन्वयक तथा अध्यक्ष तहसीलदार संघटना, संतोष कुटे समन्वयक राज्य उपाध्यक्ष तथा सचिव महसूल कर्मचारी संघटना, वैजनाथ कोरकणे समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना, नंदकिशोर माहोरे जिल्हाध्यक्ष तलाठी संघटना यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी, तसेच विविध महसूल कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.