समुद्रपूर,
soybean-procurement : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे अंतर्गत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ५ हजार ३२८ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सोयाबीन खरेदीला प्रारंभ झाला.
बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर यांच्या हस्ते काटा पूजनाद्वारे नाफेडच्या सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली. प्रथम आलेले शेतकरी विनोद ठवरी हळदगांव यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी समुद्रपूर कृउबाचे संचालक शांतीलाल गांधी, जनार्धन हुलके, जगन सुमटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी ८२ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. ज्या सोयाबीन उत्पादक शेतकर्यांनी सोयाबीन नाफेडला हमीभावाने विकण्यास ऑनलाइन नोंदणी केली नसेल त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत समिती कार्यालयात स्वतः आवश्यक कागदपत्रे घेऊन यावी व नोंदणी करुण घ्यावी, असं आवाहन करण्यात आले.