शिल्पा शेट्टी–राज कुंद्रा अडचणीत

60 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणात आयपीसी कलम 420ची भर

    दिनांक :17-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Shilpa Shetty Raj Kundra case, अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती उद्योजक राज कुंद्रा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात दाखल असलेल्या 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर कलमाच्या समावेशामुळे आता या प्रकरणातील तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

Shilpa Shetty Raj Kundra case, 
उद्योजक दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला असून, त्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे आयपीसीचे कलम 420 जोडण्यात आले असून, या घडामोडींची माहिती संबंधित दंडाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे दीपक कोठारी यांच्या कायदेशीर प्रतिनिधींनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांना परदेशात जाण्यास मनाई केली असल्याचेही समजते. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचीही अधिक कसून चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
भारतीय दंड संहितेतील Shilpa Shetty Raj Kundra case, कलम 420 हे फसवणुकीशी संबंधित असून, एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून अप्रामाणिकपणे मालमत्ता मिळवणे किंवा मालमत्तेचे हस्तांतरण करून घेणे, असा या कलमाचा अर्थ आहे. या कलमान्वये दोषी आढळल्यास कठोर शिक्षा होऊ शकते.शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यासाठी वाद ही नवी बाब नाही. याआधीही विविध प्रकरणांमुळे हे दाम्पत्य अनेकदा चर्चेत आले आहे. विशेषतः पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्रा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्या प्रकरणात त्याला जवळपास महिनाभर तुरुंगवास भोगावा लागला होता, त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली होती. याशिवाय, संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रकरणांमुळेही हे दाम्पत्य यापूर्वी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे गेले आहे.सध्या 60 कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.