हजारो लिटर शुद्ध पेयजलाची नासाडी करणार्‍या नादुरुस्त एअर व्हॉल्वची दुरुस्ती

17 Dec 2025 17:50:05
तभा इफेट
मानोरा,
shuddh drinking water शहर व तालुयातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी शासनाच्या वतीने खर्च करण्यात येणार्‍या कोट्यावधी रुपयाच्या शासकीय निधीचा गैरवापर करून निकृष्ट दर्जाची सुविधा निर्मिती करण्याच्या अनेक कामांवर दैनिक तरुण भारत ने आवाज उठवून जागृती निर्माण केल्याचे काम वेळोवेळी केले असून, अशाच प्रकारचे वृत्त गत ८ दिवसापूर्वी शेंदुर्जना आढाव गावाला पुरवठा करणार्‍या जलवाहिनीवरील निकृष्ट एअर व्हाल्व मुळे जलसंपदेची होणारी नासाडी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने जाग येऊन हे एअर व्हाल्व दुरुस्त करण्यात आले आहेत.
 

shuddh drinking water 
शेंदुर्जना आढाव या गावातील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी तालुयातील इंगलवाडी या गावातील धरणावरून जलवाहिनी टाकून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ज्याला काही वर्षेच पूर्ण झालेले आहेत. जल जीवन मिशन या यंत्रणेमार्फत कोट्यावधी रुपये खर्च करून शासन मान्य कंत्राटदारा कडून ही जलवाहिनी टाकण्यात आलेली असून, या जलवाहीनी वर इंगलवाडी ते धानोरा शेंदुर्जना आढाव दरम्यान अनेक एअर व्हॉल्व उभरण्यात आलेले आहे, या निकृष्ट दर्जाच्या एअर व्हाल्व मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन अमूल्य निसर्गसंपदेची हाणी ज्यावेळी पाणी सोडले जाते त्यावेळी होत असल्याचे वृत्त दै. तरुण भारत ने १० डिसेंबर रोजी प्रकाशित केले होते. निसर्गाकडून प्राप्त होणार्‍या शुद्ध पाण्याची निर्मिती मानवाला करता येत नसून त्याची किंमत राखण्यासाठी शेंदुर्जना आढाव येथील नागरिकांना पुरविण्यात येणार्‍या जलवाहिनीवरील निकृष्ट दर्जाचे नादुरुस्त एअर व्हॉल्व तातडीने दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने दै. तरुण भारत ने केली होती. प्रशासनाकडून या मागणीची दखल घेण्यात येऊन हे बिघडलेले व नुकसानीला कारणीभूत ठरत असलेले एअर व्हाल्व दुरुस्त करण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणी केली असता पुढे येत आहे.
Powered By Sangraha 9.0