दहेगाव-केळझर रस्ता व तुळजापूर रेल्वे थांबा मिळवण्यासाठी ना. गडकरी यांना निवेदन

17 Dec 2025 17:26:37
सिंदी (रेल्वे)
Sindhi Railway news तुळजापूर-दहेगाव आणि परिसरातील गावांसाठी विशेष करून विद्यार्थ्यांकरिता अत्यावश्यक जबलपूर-अमरावती एसप्रेसचा थांबा मिळावा तसेच दहेगाव-केळझर मार्गाची समस्या संपुष्टात काढावी, या मागणीचे निवेदन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना दिले.
 

Sindhi Railway news 
दहेगाव आणि Sindhi Railway news  परिसरातील विद्यार्थी, व्यापारी तसेच चाकरमान्यांना वर्धा व नागपूर येथे जाण्यासाठी जबलपूर-अमरावती एसप्रेस फार गरजेची व सोईची गाडी आहे. तिचा २ मिनिटांचा थांबा तुळजापूर स्थानकावर दिल्यास रेल्वेचा महसूल वाढेल. त्यासाठी अनेकदा निवेदन दिली. माजी खासदार तडस आणि खा. अमर काळे यांनी देखील शब्द दिला. परंतु, थांबा मंजूर झाला नाही. दहेगाव ते केऴझर या मार्गावरील जड वाहनांची वर्दळ बघता त्या मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात यावे या विषयांवर ना. नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले असता रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून कळवितो असे सांगितले.यावेळी जिपचे माजी सदस्य विनोद लाखे, अमोल पिठाले, अनिल चव्हाण, सचिन धोटे यांनी पुढाकार घेतला.
Powered By Sangraha 9.0