‘स्ट्रेंजर थिंग्स’ सीझन ५ वॉल्यूम २चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित

17 Dec 2025 11:22:34
मुंबई,
Stranger Things Season 5 Volume 2 ओटीटी विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या नेटफ्लिक्सच्या ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या वेबसीरिजने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सीरिजच्या पाचव्या आणि अंतिम सीझनच्या वॉल्यूम २चा हिंदी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, ट्रेलर पाहताच चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. हा सीझन कथानकाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला असून, हॉकिन्समध्ये होणारी अंतिम लढाई आतापर्यंतच्या सर्व सीझनपेक्षा अधिक धोकादायक आणि भव्य असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते.
 

Stranger Things Season 5 Volume 2 
ट्रेलरमध्ये वेक्ना हा खलनायक यावेळी अधिक शक्तिशाली आणि भयावह स्वरूपात दिसत आहे. मागील सीझनच्या तुलनेत त्याचा प्रभाव अधिक वाढलेला असून, हॉकिन्स शहरावर मोठे संकट कोसळताना दिसते. अ‍ॅक्शन, हॉरर आणि थरारक दृश्यांनी भरलेल्या या ट्रेलरमुळे ‘स्ट्रेंजर थिंग्स’चा शेवटचा सीझन प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.नेटफ्लिक्सवर ही सीरिज हिंदीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याने भारतीय प्रेक्षकांमध्ये तिची क्रेझ आणखी वाढली आहे. पाचव्या सीझनच्या कथेचा पहिला भाग वॉल्यूम १मध्ये आधीच दाखवण्यात आला आहे. उर्वरित कथेसाठी हिंदी प्रेक्षकांना ख्रिसमसपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा अंतिम सीझन दोन नव्हे, तर तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, त्यातील शेवटचा भाग नववर्षाच्या सुमारास येण्याची शक्यता आहे.
 
 
डफर ब्रदर्स यांनी Stranger Things Season 5 Volume 2 निर्माण केलेल्या या सीरिजमध्ये केवळ अ‍ॅक्शन आणि भीती नाही, तर मित्रांमधील भावनिक नातेसंबंधांचाही सखोल वेध घेतला आहे. ट्रेलरमधून असेही सूचित होते की ‘अपसाइड डाउन’ची दुनिया आतापर्यंत जितकी भयानक दाखवली गेली आहे, त्यापेक्षा ती अधिकच खौफनाक ठरणार आहे. अखेरच्या युद्धासोबतच अनेक धक्कादायक सत्येही उघडकीस येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.हिंदी ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, हॉकिन्सची टीम आणि वेक्ना यांच्यातील निर्णायक संघर्ष पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘स्ट्रेंजर थिंग्स’चा हा शेवटचा प्रवास प्रेक्षकांच्या लक्षात कायमस्वरूपी ठसा उमटवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0