बेपत्ता आर्यनचा मृतदेह तलावात आढळला

17 Dec 2025 19:40:26
केळझर, 
missing-aryan : केळझर येथील घराच्या आवारातून बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय आर्यन बावणे याचा मृतदेह परिसरातीलच मत्स्य बीज केंद्राच्या तलावात १७ रोजी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
 
 
 
KJ
 
 
 
आर्यन हा रविवारी घराच्या आवारात खेळत होता. मात्र, तो अचानक बेपत्ता झाला. शोध घेऊनही तो कुठेच आढळून आला नसल्याने अखेर अज्ञात व्यतीने फुस लाऊन पळविल्याची तक्रार कुटुंबीयांनी सेलू पोलिस ठाण्यात दाखल केली. घटनेची नोंद घेत पोलिसांनी आर्यनचा शोध सुरू केला. शोध मोहीम राबविली जात असतानाच केळझर परिसरातील तलावात आर्यनचा मृतदेह आढळला. पोलिस निरीक्षक मनोज गभने यांच्या नेतृत्वात पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढून पंचनामा करून उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. आर्यनच्या शरीरावर कुठल्याही जखमा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पुढील तपास सेलू पोलिस करीत आहे.
Powered By Sangraha 9.0