श्री साईनाथ फार्मसी कॉलेज डावलामेटी येथे वृक्षारोपण

17 Dec 2025 18:51:22
नागपूर,
Shri Sainath Pharmacy College डावलामेटी येथील श्री साईनाथ फार्मसी कॉलेज पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
 
 
Shri Sainath Pharmacy College
 
यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाची गरज तसेच भविष्यातील पिढीसाठी निसर्ग जपण्याची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसाची कृती नसून ती सतत जपण्याची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. Shri Sainath Pharmacy College विद्यार्थ्यांनी वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
सौजन्य: शेफाली दुधबडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0