ट्रम्प यांनी त्यांच्या मुलाच्या साखरपुड्याची केली घोषणा; होणारी वधू कोण?

17 Dec 2025 15:29:00
वॉशिंग्टन, 
trump-announced-sons-engagement अमेरिकेचे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसमध्ये लवकरच आनंदोत्सवाचे सूर उमटणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मोठ्या मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली आहे. सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ख्रिसमस रिसेप्शनदरम्यान त्यांनी ही आनंदाची बातमी स्वतः जाहीर केली. ट्रम्प यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर लवकरच पाम बीच येथील प्रसिद्ध सोशलाइट बेटिना अँडरसनसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत.
 
trump-announced-sons-engagement
वृत्तांनुसार, ही खास घोषणा ख्रिसमसच्या सेलिब्रेशन दरम्यान करण्यात आली. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष स्टेजवरून बाजूला होताना दिसत आहेत, त्यानंतर ट्रम्प ज्युनियर त्यांची होणारी बायको बेट्टीना अँडरसनसह बाहेर पडले. उपस्थित पाहुण्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. समारंभादरम्यान, ४७ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी प्रेक्षकांना संबोधित केले. trump-announced-sons-engagement बेट्टीना अँडरसन यांनी ट्रम्प ज्युनियर यांचे "हो" असे म्हणल्याबद्दल आभार मानले. दरम्यान, बेट्टीना अँडरसन यांनी व्हाईट हाऊसच्या रिसेप्शनचे आयोजन केल्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प आणि फर्स्ट लेडी यांचे आभार मानले. तिने सांगितले की हा वीकेंड तिच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय काळ आहे आणि ती स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान मुलगी मानते.
सौजन्य : सोशल मीडिया 
वृत्तानुसार, ३९ वर्षीय बेट्टीना अँडरसन ही परोपकारी हॅरी लॉय अँडरसन ज्युनियर आणि इंगर अँडरसन यांची मुलगी आहे. ती फ्लोरिडामध्ये मानसिक आरोग्य जागरूकता आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर सक्रियपणे काम करते. २०२४ पासून बेट्टीना आणि ट्रम्प ज्युनियर सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. पाम बीचवरील अनेक कार्यक्रमांमध्ये आणि ट्रम्प कुटुंबाच्या मेळाव्यातही त्यांना एकत्र पाहिले गेले आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ट्रम्प ज्युनियरने २००५ मध्ये मॉडेल व्हेनेसा हेडनशी लग्न केले होते आणि त्यांना पाच मुले आहेत. २०१८ मध्ये हे लग्न संपले. त्यानंतर त्याचे फॉक्स न्यूज अँकर किम्बर्ली गिलफॉयलशी नाते होते. दोघांनी सुमारे सहा वर्षे डेट केले आणि २०२२ मध्ये त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली. तथापि, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे नाते संपले.
Powered By Sangraha 9.0