७ स्कूल बसेसला १ लाखाचा दंड

17 Dec 2025 19:43:44
वर्धा, 
fines-for-school-buses : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्ठीने स्कूल बसेस व व्हॅनच्या चालक व मालकांनी मोटर वाहन कायद्याचे काटेकारपणे पालन करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येते. मात्र, नियमांना डावलून काही स्कूल बसेस व व्हॅन वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्यावर मंगळवार १६ रोजी उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम राबवून ७ स्कूल बसेस व व्हॅनवर कारवाई करून १ लाख रुपयांचा दंड ठोठावला.
 

संग्रहित फोटो 
 
 
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक नितीन ऊके, सुबोध तायडे, पंकज नैताम, चंदन भगत, प्रफुल्ल मेश्राम यांनी विविध ठिकाणी स्कूल बस व व्हॅन अडवून पाहणी केली. तपासणी मोहिमेदरम्यान ७ स्कूल बस व व्हॅन चालकांनी टॅस भरला नसल्याचे पुढे आले. काही स्कूल बस व व्हॅन चालकांनी २ ते ३ वर्षांपासून तर काहींनी २ ते ३ महिन्यांचा टॅस भरला नसल्याचे पुढे आल्यावर १ लाख २४४ रुपयांचा दंड ठोठावला.
 
जिल्ह्यात ४२६ वैध स्कूल बस आणि व्हॅन
 
 
जिल्ह्यात एकूण ६३९ स्कूल बसेस व व्हॅन आहेत. त्यापैकी ४२६ स्कूल बसेस व व्हॅन संपूर्ण नियमांनुसार प्रवास योग्य आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा या हेतूने उपप्रादेशिक परिवहन विभागाने नियमांना बगल देणार्‍या स्कूल बस व व्हॅन चालक व मालकांविरुद्ध कारवाईसाठी मोर्चा उघडला आहे.
Powered By Sangraha 9.0