वन्यप्राण्यांचा धुमाकूळ पिकांचे नुकसान

17 Dec 2025 20:33:12
तभा वृत्तसेवा
नेर, 
damage-to-crops : तालुक्यातील मालखेड खुर्द (इंदिरानगर) शिवारात जंगली जनावरांनी धुडगूस घातला असून, पिके फस्त करण्याचा सपाटा लावला आहे. येथील महिला शेतकरी निमा फुलसिंग राठोड यांच्या शेतातील तुरीचे पीक रानडुकरांसह वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केले आहे.
 
 
K
 
रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेले सोने डोळ्यादेखत फस्त झाल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल झाले आहे. मालखेड आणि इंदिरानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचा वावर वाढला आहे. ही जनावरे रात्रीच्या वेळी शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहेत. माकडांच्या टोळ्यांमुळे तर दिवसाही पिकांचे रक्षण करणे कठीण झाले आहे. वन्यप्राण्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, शेतकèयांनी लावलेले भांडवल ही निघते की नाही, अशी स्थिती आहे. जंगली जनावरे शेतीचे नुकसान करत असल्याची ओरड वारंवार करूनही वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकèयांनी केला आहे. वनविभागाने तत्काळ या भागाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मालखेड परिसरातील शेतकèयांनी केली आहे.
 
 
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकाèयांनी उपाययोजना करण्यात येत असून कृती संरक्षण समिती कार्यरत आहे. नुकसानग्रस्त शेतकèयाला नुकसान भरपाई देण्यात येईल, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0