भाव नसल्याने कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच साठवून

17 Dec 2025 20:35:20
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
cotton-farmers : शासकीय हमी केंद्रावर लादण्यात असलेल्या विविध अटी व खासगी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने कापूस शेतकèयांच्या घरात पडून आहे. यामुळे शेतकèयांचे अर्थचक्र बिघडले असून, भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
 
 
LK
 
 
 
यावर्षी अतिवृष्टीच्या पावसाने शेतकèयांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामात वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकावर किडींचे आक्रमण झाले होते. उत्पन्न हाती येण्याच्या तयारीत असताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
 
 
कापूस, सोयाबीन व इतर पिके हाती येण्याच्या तयारीत असताना परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. शेतकèयांनी कसेबसे कापूस व सोयाबीन पीक काढले. मात्र कापसाला भाव नसल्याने सध्या कापूस शेतकèयांच्या घरात आहे. लागवडीचा खर्चही निघाला नाही. शेतकèयांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी झाले आहे.
 
 
बहुतांश शेतकèयांनी कर्ज घेऊन कापसाचे पिक घेतले आहे. शेतकèयांवर बँक व खासगी सावकारांचे कर्ज आहे. आता कर्जवसुलीसाठी शेतकèयांकडे तगादा लावला जात आहे. यामुळे शेतकरी सध्या गंभीर परिस्थितीत आहेत.
Powered By Sangraha 9.0