डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया

17 Dec 2025 20:21:55
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
dr-babasaheb-ambedkar-swadhar-scheme : शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात 2025-26 मध्ये प्रवेश घेणाèया विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आभासी अर्ज करणे आवश्यक आहे.
 
 
JNK
 
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नवीन किंवा नुतनीकरण अर्ज सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी संबंधीत संकेतस्थळावर अर्ज भरण्याकरीता 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.
 
 
विद्यार्थ्यांनी आभासी अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह 31 डिसेंबरपर्यंत संबंधित कार्यालयात हार्डकॉपी सादर करावी. अर्ज सादर न केल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0