भूमी अभिलेख कार्यालयातर्फे सर्वेक्षण सुरू

17 Dec 2025 20:30:48
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
land-records-office : भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून प्रॉपटी कार्ड तयार करण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण सुरू आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 20 (2) खालील हक्क चौकशी नियम 2 (1) (2) अन्वये आणि ज. म. अधिनियम कलम 227-228 अन्वये समन्स अन्वये हे सर्वेक्षण आहे, असे उपअधीक्षक नरेंद्र बोबडे, विजय दिवेकर अनिल पिंपळे व भूमीलेख मुख्यालयातील नीलेश वाहाने यांनी सांगितले.
 
 
 
y17Dec-Survey
 
 
 
सर्वेक्षण सुरू असताना आपण उपस्थित रहावे. जेणेकरून आवश्यक दस्तऐवज किंवा पुरावा आपण केलेल्या मागणीबाबत चौकशी करण्यात येईल असे नोटीसद्वारे कळविण्यात आले आहे. या नोटीसद्वारे योग्य रितीने प्राधिकृत केलेल्या अभिकर्त्यांमार्फत उपस्थित राहण्यास कसूर केल्यास मागणीचा तुमच्या अनुपस्थितीत निर्णय करण्यात येईल, असे नोटीसद्वारे कळविण्यात आले.
 
 
याकरीता लागणारे दस्तऐवज आपल्या घराची खरेदीची सत्य प्रत, सातबारा असल्यास सातबारा, अ‍ॅसेसमेंटची सत्यप्रत व आलेली नोटीस याची एक फाईल करून कार्यालयात सादर करावी, असे उपअधीक्षक भूमी अभिलेख वणी यांच्याद्वारे कळविण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0