यवतमाळ,
public-holiday-for-voting : नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा सुधारित कार्यक्रमानुसार यवतमाळ, वणी, दिग्रस आणि पांढरकवडा येथे शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क निर्विघ्नपणे बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, यवतमाळ संपूर्ण नगरपरिषद क्षेत्रासह वणी, दिग्रस आणि पांढरकवडा नगरपरिषदेच्या विविध प्रभागांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामध्ये वणी नगरपरिषदेत प्रभाग क्र. 14 क, तसेच दिग्रस नगरपरिषद प्रभाग क्र. 2-ब, प्रभाग क्र.5 ब व प्रभाग क्र.10 ब, पांढरकवडा नगरपरिषद प्रभाग क्र. 8 अ आणि प्रभाग क्र.11 ब येथे निवडणूक होणार आहे. या ठीकाणी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सार्वजनिक सुट्टी लागू राहणार आहे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.