समुद्रपूर,
Asola residents protest, तालुयातील आसोला येथील ग्रापंचे ग्रामविकास अधिकारी डी. बी. बांबोळे यांच्या बदलीचा आदेश निघूनही प्रभार सोडण्यास तयार नसल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी प्रहार जनशती पक्षाच्या मार्गदर्शनात पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, नागरिकांचा आक्रोश लक्षात घेऊन विस्तार अधिकारी नरेश जामुनकर यांनी ग्रामविकास अधिकारी डी. बी. बांबोळे यांचा प्रभार काढून सूर्यवंशी यांच्याकडे सोपविला.
पंचायत समिती कार्यालयाला वारंवार भेटी देऊन सुद्धा गटविकास अधिकारी, ग्राम विस्तार अधिकारी दुर्लक्ष करत होते. यांच्या मनमानी कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. प्रहारच्या दणयाने संबंधित अधिकार्यांकडे प्रभार सोपवून ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामविस्तार अधिकारी नरेश जामुनकर व नरेश वनकर यांच्या समक्ष बांबोळे यांनी सुर्यवंशी यांच्याकडे सोपविला.
यावेळी प्रहारचे माजी जिल्हाप्रमुख देवा धोटे, ग्रापंचे माजी सदस्य ईश्वर कोळसे, ग्रापं सदस्य मनोहर जिवतोडे, कृतिका कोळसे, सुनील तळवेकर, शुभम वैद्य, बंडू बाहुरे, श्रावण कुमरे, गजानन चंभारे, रामकृष्ण तलवेकर, गणेश इटनकर, अनुज भगत, दुर्वास नाचनकर, आशिष गुरफोडे, गोपाल बलखंडे, आशिष गुरफोडे, उषा जिवतोडे, वनिता मुंढरे, वनिता नचानकर, कल्याणी गुरफोडे, सुरेखा धोटे, राणी गडमडे, माधुरी गुरफोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.