चातगाव-कारवाफा पुलाचे काम कासवगतीने

18 Dec 2025 18:11:31
गडचिरोली,
Gadchiroli bridge गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या चातगाव-कारवाफा मार्गावरील पुलाच्या कामामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे होणारे हाल लक्षात घेता, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी बुधवारी, 17 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली. पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. येत्या काही महिन्यात हा मार्ग कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीसाठी खुला करण्याचे कडक निर्देश दिले.
 

Gadchiroli bridge 
या मार्गावरील Gadchiroli bridge  पूल गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने पावसाळ्यात आणि इतर वेळीही नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागते. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासकीय दिरंगाईचा फटका सामान्य जनतेला बसत असल्याची खंतही आमदार डॉ. नरोटे यांनी व्यक्त केली.आमदारांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना घटनास्थळीच ठणकावून सांगितले की, पुलाचे मुख्य काम युद्धपातळीवर पूर्ण करा. मात्र, तोपर्यंत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुढील दोन दिवसांच्या आत तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करून द्यावा. जनतेच्या हिताच्या कामात यापुढे कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, सिन्नू दुल्लमवार, पवनजी येरमे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे धीरज बड्डे, पुरुषोत्तम मेश्राम तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. 
Powered By Sangraha 9.0