थंडीमुळे आजारांचे प्रमाणात वाढ

18 Dec 2025 20:16:32
नागपूर,
cold-illness : हिवाळी अधिवेशनानंतरही नागपुरात थंडीचा जोर कायम आहे. विशेषतः विदर्भात गोंदिया सर्वांत थंड असून गुरुवारी किमान तापमान अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, ते सर्वांत थंड शहर ठरले आहे. तर नागपूर तापमान १०.० अंशांवर असून गत काही दिवसांपासून तापमानात फरक जाणवत आहे. थंडीमुळे आजारांचे प्रमाणही वाढले असून सर्दी,खोकला, तापाचे रुग्ण रुग्णालयात दिसून येत आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे गत दहा दिवसात औषधींच्या दुकानातील गर्दी वाढली आहे.
 
 
thandi-viral-infection
 
 
 
वस्त्यांमध्ये डास
 
 
मुख्यत: डिसेंबरच्या सुरुवातीपासून वातावरणातील बदलामुळे वायरल इन्फेक्शन झपाट्याने वाढू लागले आहे. नागनदीच्या काठावरील सर्वच वस्त्यांमध्ये डासांची संख्या वाढली आहे. केडीके महाविद्यालयाच्या मार्गावरील व्यंकटेश नगर, नासुप्रची घरकुल योजना परिसरात डास वाढले आहे. याशिवाय रेल्वे स्थानक, बसस्थानक, बाजारपेठ, रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूने विविध आजार वाढले आहे. याशिवाय भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने ताप वाढला आहे.
 
 
प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी
 
 
 
एकंदीत डेंगू, चिकनगुनिया, डायरिया, हेपेटायटीस सारखे रोग पसरू नयेत,यासाठी मनपा प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. निवडणूकीच्या वातावरणात प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. वातावरणातील बदल आता जाणवत असून वायरल इन्फेक्शन झपाट्याने वाढू लागले आहे.
 
गंभीर आजार होण्याचा धोका
 
थंडीच्या संसर्गांमुळे मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्यांमध्ये गंभीर आजार निर्माण होण्याचा धोका असतो. दरम्यानच्या काळात शासकीय रुग्णालयांवर अतिरिक्त दबाव येतो. बस, रेल्वे, विमान, खाजगी वाहने आदींसह इतर सार्वजनिक वाहतूकीच्या ठिकाणी दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक एकत्र येतात. त्यामुळे संसर्गाचा प्रसार होण्यास वेळ लागत नाही.
 
अनेक मार्गावर धूळीचे साम्राज्य
 
 
शहरातील विकास अनेक मार्गावर धूळीचे साम्राज्य पसरले आहे. वायू प्रदूषणाचाही परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदूषित हवेच्या गुणवत्तेमुळे फुफ्फुसे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे, त्यामुळे वारंवार खोकला, सर्दी आणि ताप येण्याचा धोका वाढला असल्याची माहिती डॉ. अजय काळे यांनी दिली आहे. कोविड नंतर रोगप्रतिकारक शक्तीमध्ये होणारे बदल, त्याशिवाय अस्वच्छता आणि पाणी हेपेटायटीस, नोरोव्हायरस आणि डायरिया यांसारख्या आजारांच्या जलद वाढण्यास कारणीभूत ठरतात. घराबाहेर अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे, हात धुणे, स्वच्छ पाणी पिणे, डासांवर नियंत्रण ठेवणे, पाणी साचू न देणे, पौष्टिक अन्न खाणे आणि पुरेशी झोप घेणे यासारख्या दैनंदिन सवयी या रोगांवर सर्वोत्तम उपाय आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील १५ ते २० तापमान साधारण पातळीवरच राहण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0