निकाल लागताच अतिक्रमणधारकांचा प्रश्न निकाली : मुख्यमंत्री फडणवीस

18 Dec 2025 21:20:22
देवळी,
devendra-fadnavis : देवळीचा विकास करायचा असेल तर नगरपरिषद अध्यक्ष व सदस्य हे भाजपच्या असावा लागेल. केंद्र व राज्य सरकार एकत्र काम करत असताना निधी थांबणार नाही. देवळीत सभेची आवश्यकता नाही देवळीची जनता पाठीशी आहे. पण, तडस यांचा आग्रह होता म्हणून आलो. निवडणूक निकाल लागले की येथील अतिक्रमणचा प्रश्न निकाली काढू, तुम्ही भाजपाला साथ द्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 

cm 
 
 
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत देवळीच्या राजकारणात भाजपने थेट मुख्यमंत्री उतरवत शक्तिप्रदर्शन केले. अध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा रामदास तडस व सर्व प्रभागांतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आठवडी बाजार मैदान देवळी येथे आज १८ रोजी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेने देवळीतील निवडणूक लढतीला निर्णायक वळण दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हध्यक्ष. संजय गाते, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. राजेश बकाने, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा तडस, नगर सेवक पदाचे उमेदवार राहुल चोपडा व अन्य उमेदवार उपस्थित होते.
 
 
 
ते पूढे म्हणाले की, गावाचा विकास देशाचा विकास हे सत्य देखील होत पण गेल्या सात दशकात सांगत राहिलो पण राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला होता गावासोबतच शहरात देखील लोक राहतात त्यामुळे शहराचा देखील विकास होणे आवश्यक आहे. 40 हजार गावांमध्ये 6.5 कोटी लोक राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक देवळी सारख्या शहरात राहतात या चारशे शहरात सात दशकात दुर्लक्ष झाले 2014 देशात माननीय मोदी सरकार आलं आणि महाराष्ट्रात आपलं सरकार पुन्हा आलं शहरांमध्ये हजारो कोटी रुपये निधी देण्याचा प्रयत्न झाला आणि शहरे बदलू लागली गावातील लोक शहरात आली जिथे मिळेल तिथे अतिक्रमण करून राहायला लागली लोकांना राहायला जागा नव्हती वाईट जीवन जगावे लागत म्हणून मोदीनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली व आम्हाला सांगितले की प्रत्येक गरिबाला घर भेटले पाहिजे आमच्या लक्षात आले पैसे आहे पण जागा नाही पट्टे नसल्यामुळे घरकुल मिळत म्हणून दोन महिन्यांपूर्वी आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि ठरविले रहिवासी अतिक्रमण आहे.
 
 
जो जिथे बसलेला आहे त्या ठिकाणी त्याला मालकी हक्क पट्टा द्यायचा आणि कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्के घर बांधण्याकरता पैसे द्यायचे म्हणून काळजी करू नका रामदासजी मला म्हणाले की देवी शहरात अतिक्रमण धारकांच्या पट्ट्याचा मोठा प्रश्न आहे पण तुम्ही चिंता करू नका नगरपरिषद निवडून आली की तात्काळ मोजणी करा व पट्टे तयार करा पूर्ण अधिकार तुम्हाला दिला आहे राज्य सरकारच्या वतीने चिंता करण्याचे कारण नाही तसेच झुडपी जंगल जागेवर बसलेले अतिक्रमण धारक होते त्यांच्याकरता मी गेल्या आठ वर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आता मी कोर्टाकडून परवानगी आणली असून त्यांनाही आता आपल्याला पट्टे देता येईल व कोणीही बिना घराचे राहणार नाही. मोदींनी आपल्याला आता 30 लाख घरे दिलेली आहे आपल्याला गरिबांना सोयी द्यायचे आहे. शहर वाढले की पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. मागच्या काळात 21 कोटीची योजना शहराला दिली होती ती योजना नवीन एरिया निर्माण झाल्यामुळे कमी पडत आहे नवीन पाणीयोजनाकडेही लक्ष द्यायचे आहे आता जनतेचे राज्य येणार असून मोदींनी हर घर जल योजना आणली असून या योजनेतून प्रत्येक घराला नळाने पाणी मिळणार आहे. देवळीत 40 कोटी रुपयाची गटारी योजनेचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे निवडणूक झाल्यानंतर आपले सर्व सदस्य व अध्यक्ष आल्यानंतर ज्याला मान्यता आपण देतो असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
ते पुढे म्हणाले काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक नेते ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलताना म्हणत होते की ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताचा पराभव झाला 12 लाख सैनिकांची गरज काय यांची डोके बिघडली आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आता आपण केंद्र आणि राज्याचा निधी आणणार असून आपल्या शहराचा विकास करण्याकरिता आपल्याला आपली नगरपरिषद निवडून आणणे आवश्यक आहे दुसरा कोणीही निवडून आल्यास वेगाने चाललेला विकास थांबेल. दिव्य शहरात या अगोदर सुद्धा माजी खासदार रामदास तडस आमदार राजेश बकाने व शोभा तडस याच्या काळात देवळी शहराचा विकास झालेला आहे उर्वरित विकासाची वाटचाल सुरू राहील त्यामुळे वीस तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा पुढची पाच वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ असे आवाहनही त्यांनी केले.
 
 
यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री पंकज भोयर यांनी निधी खेचून आणण्याकरिता बीजेपीचा अध्यक्ष असणे जरुरी आहे. देवा भाऊंनी महाराष्ट्राला विकासाचे राजकारण दिले आहे यापुढेही देवा भाऊ आपल्या पाठीशी राहून आपल्या देवळी शहराचा विकास करण्याकरिता आपल्याला मदत करणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री पंकज भोयर यांनी भाजपाचे उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले.
 
 
यावेळी आ. राजेश बकाने, रामदास तडस यांनी मार्गदर्शन केले. आ. समीर कुणावार आ. दादाराव केचे, भाजपा अध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा तडस, सुधीर दिवे, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैशाली येरावार, आरपीआयचे विजय आगलावे माजी भाजपाध्यक्ष सुनील गफाट यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
या सभेमुळे भाजपच्या प्रचाराला प्रचंड उभारी मिळाली असून, देवळी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच बाजी मारणार असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.
Powered By Sangraha 9.0