एअरलाइन्सला आता दाट धुक्याचाही फटका

18 Dec 2025 20:31:14
नागपूर,
indigo-airline : गेल्या महिन्याभरापासून इंडिगो एअरलाईन्सचे उड्डाण संचालन पूर्णपणे विस्कळीत झाले असताना आता एअरलाइन्सला दाट धुक्याचाही फटका बसत आहे. उड्डाणे रद्दमुळे प्रवासी वैतागून गेले आहे. प्रवासी विमान कंपनीची वेळापत्रके नोव्हेंबर महिन्यापासून अक्षरशः कोलमडली आहे. डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर प्रवाशांना अचानक सूचना मिळते की उड्डाण रद्द करण्यात आले आहे. इंडिगोच्या वैमानिकांची कमतरता, तांत्रिक समस्या आणि इतर कारणांमुळे गोंधळाची मालिका सुरू असताना दाट धुक्याचा फटका प्रवाशांना बसला आहे.
 

indigo-airline 
अशीच परिस्थिती काही दिवसपर्यंत राहणार
 
मुख्यत: उड्डाणाच्या वेळेपर्यंत फ्लाइट ऑन-टाइम असल्याची माहिती दिल्यानंतरही विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांना अचानक सूचना की उड्डाण रद्द करण्यात आले आहे.यामुळे प्रवाशांचा संताप वाढतो. गत तीन चार दिवसांपासून नागपूर-मुंबईसह पुणे, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू आणि दिल्ली या प्रमुख शहरांकडे जाणारी अनेक उड्डाणे रद्द झाली आहे. अशीच परिस्थिती यानंतर काही दिवसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. डिसेंबर व जानेवारी महिन्यात धुक्यांचा प्रश्न निर्माण होतो.
 
धुक्यांमुळे उड्डाणांना विलंब
 
विमानांचे आणि टेकऑफमध्ये यामुळे अडथळा निर्माण होतो. उत्तर आणि मध्य भारतातील विमानतळांवर हिवाळ्यात वारंवार धुके निर्माण होते, ज्यामुळे उड्डाणांना विलंब होतो आणि उड्डाणे रद्द होतात. लखनौ, वाराणसी, पटना, जयपूर, अमृतसर, भोपाळ, इंदूर आणि नागपूर यासारख्या अनेक विमानतळांवरही वारंवार धुक्यांमुळे हिवाळ्यात आर्थिक भार वाढतो.
 
धुक्याचा विमानसेवेवर परिणाम
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय यापूर्वी पोर्टर सेवेचा फटका बसला होता. एअरलाइन्सला दाट धुक्याचाही फटका बसण्यास सुरुवात झााल्याने फ्लाइट रद्द होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणार्‍या इंडिगोची उड्डाणे रद्द होत असल्याने कडाक्याच्या थंडीसह दाट धुक्याचा विमानसेवेवर परिणाम होत आहे. नागरी विमान मंत्रालयाने धुक्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला आहे. नागरी विमान वाहतूक धुक्याच्या परिस्थितीतील तयारीची पाहणी केली असून सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0