निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीची मनोज जरांगेशी चर्चा

18 Dec 2025 19:48:26
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
manoj-jarange : निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व बुडीत क्षेत्रातील दोनशे शेतकèयांनी जवळपास पंधरा वाहनांच्या ताफ्यासह मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे गुरुवार, 18 डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्या घरी भेट घेतली. तब्बल दोन तास निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या प्रत्येक बाजूवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
 
 
jarange
 
 
 
ही भेट त्रिशूल पाटील यांच्या मध्यस्थीने घडवून आली. मनोज जरांगे यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाची प्रत्येक बाजू समजून घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना या प्रकल्पाला लोकांचा विरोध असल्याचे कळविले. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण जलसंपदा मंत्री गिरिश महाजन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धरणविरोधी संघर्ष समितीची बैठक लावून देऊ, असे आश्वासन यावेळी दिले.
 
 
यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, प्रल्हाद गावंडे, बंडू नाईक, बंटी जोमदे, उत्तम भेंडे, गजानन डाखोरे, भगवतीप्रसाद तितरे यांच्यासह दोनशे लोक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0