अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-news : घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधील गॅस ऑटाेच्या गॅस किटमध्ये भरून काळाबाजार करणाèया दाेघांना गुन्हे शाखेच्या मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने अटक केली. इम्रान हनिफ शेख (31) आणि देवा सीताराम रामटेकेकर (40) वैष्णवीनगर, कळमना अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. दाेन्ही आराेपींनी जुना कामठी मार्गावरील फुलेनगर येथील प्लाॅट क्र. 104 येथे हा अड्डा सुरू केला हाेता.

आराेपी हे घरगुती वापरासाठी असलेल्या सिलेंडरचा साठा करीत हाेते. या सिलेंडरमधील गॅस मालवाहू वाहने आणि ऑटाेत भरत हाेते. ही माहिती मानवी वाहतूक प्रतिंध पथकाला समजताच त्यांनी या अड्डयावर पाळत ठेवली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास एक मालवाहू वाहन आणि तीन आसनी ऑटाे या अड्डयावर गॅस भरण्यासाठी आले हाेते. दाेन्ही आराेपी हे वाहनात गॅस भरत असताना पाेलिसांनी धाड घातली. या धाडीत एचपी गॅस कंपनीचे 17 भरलेले गॅस सिलेंडर, 10 रिकामे सिलेंडर, 3 रिील मशीन, 2 वजनकाटे, माेबाईल, राेख 3 हजार रुपये मालवाहू वाहन, ऑटाे असा 7 लाख 24 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमना पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवून दाेन्ही आराेपींना अटक केली. आराेपींना मुद्देमालासह कळमना पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई महिला पाेलिस निरीक्षक ललिता ताेडासे, सहायक उपनिरीक्षक दीपक िंबंदाणे, शाम अंगुथलेवार, सुनील वाकळे, सचिन श्रीरामे, राम निरगुडवार, विलास चिंचुलकर, ऋषीकेश डुमरे, अश्विनी खाेडपेवार, पल्लवी वंजारी यांनी केली.