वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या पथकाला धमकी; ग्राहकाविरुद्ध गुन्हा दाखल

18 Dec 2025 20:23:29
नागपूर,
nagpur-news : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणार्‍या एका ग्राहकाविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना गुरुवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास दयानंद पार्क परिसरातील ’टी लवर शॉप’ समोर घडली.
 
 

mahavitran-one 
 
 
जरीपटका परिसरात वसुलीची मोहीम
 
 
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, महावितरणच्या सिव्हिल लाईन उपविभागाचे सहायक अभियंता विनय गोंधुळे हे रुपक उपथडे, मोरेश्वर पटले, सोनाली वाघमारे, अजय कनोजीया, पंकज वरकडे, मोर्य, रोशन रणदिवे, नितनवरे, राजकुमारी मरसकुले, दर्शना गुरुमुळे, अपेक्षा बहादुरे, ताराचंद दुबे, या आपल्या पथकासह जरीपटका परिसरात थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवत होते. दयानंद पार्क गार्डनजवळ असलेल्या ’टी लवर शॉप’चे मालक रणबीर सिंग इकबाल सिंग यांच्याकडे मागील पाच महिन्यांपासून २२,६०० रुपयांची वीज देयके थकीत होती. महावितरणच्या महिला दुकानात उपस्थित महिलेला देयक विनंती केली. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही प्रतिसाद न मिळाल्याने नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
 
 
महावितरणच्या कर्मचार्‍यांशी हुज्जत
 
वीज पुरवठा खंडित केल्याचा राग धरून आरोपी रणबीर सिंग (वय ३३ वर्ष, रा. दीक्षित नगर) याने घटनास्थळी येऊन महावितरणच्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली. त्याने उपस्थित कर्मचार्‍यांना अत्यंत अश्लील भाषेत केली. कोणालाही लाख रुपये देऊन तुझा मर्डर करीन आणि पाय तोडीन, अशी धमकी त्याने तंत्रज्ञ रुपक उपथडे यांना दिली. इतकेच नव्हे तर पथकातील महिला कर्मचारी आणि कार्यकारी अभियंता धम्मदीप फुलझेले यांनाही अपमानास्पद वागणूक देत जीवे मारण्याची धमकी दिली.
 
 
या प्रकारानंतर सहायक अभियंत्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सहायक पोलीस शशिकांत तायडे यांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेत आरोपी रणबीर सिंग इकबाल सिंग विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ व धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तायडे करत आहेत.
Powered By Sangraha 9.0