नागपूर,
pooja-pal : प्रादेशिक स्तरावरून टॉप २० मध्ये स्थान मिळवत थेट राष्ट्रीय पातळीवर नागपूरचे नाव उज्ज्वल करणारी कामगिरी पूजा पाल हिने केली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यांमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांमधून निवड होऊन राष्ट्रीय पर्यावरण युवा संसद २०२६ साठी पूजा पाल हिची निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे, राष्ट्रीय स्तरावर नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल आज व्हीएमव्ही महाविद्यालयात तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य, उप-प्राचार्य, सर्व प्राध्यापक तसेच एसएफडी नागपूर संयोजक हर्ष ठाकरे, पूर्व जिल्हा विद्यार्थी विस्तारक वैष्णवी गायकवाड आणि महाल नगर मंत्री राजेश बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पूजा पाल हिच्या या यशामुळे नागपूर विद्यापीठासह संपूर्ण नागपूर शहराचा गौरव वाढला आहे. तिची ही निवड पर्यावरण विषयक जनजागृती व युवकांच्या सक्रिय सहभागाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. पूजा पाल हिच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या असून, तिचा हा प्रवास अधिक प्रेरणादायी ठरो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.