प्रियांका गांधींची गडकरींशी भेट: विकास प्रकल्पांवर चर्चा आणि हास्यरंजक क्षण; VIDEO

18 Dec 2025 14:27:53
नवी दिल्ली,  
priyanka-gandhi-meets-gadkari संसद सभागृहात आज एक खास आणि आनंददायी दृश्य पाहायला मिळाले. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. ही भेट फक्त औपचारिक नव्हती; दोघांमध्ये विकास प्रकल्पांवर चर्चा, विनोद आणि गप्पा, हे सगळ पाहायला मिळाले, ज्यामुळे वातावरण हलके आणि मैत्रीपूर्ण बनले.

priyanka-gandhi-meets-gadkari 
 
प्रियांका गांधी वायनाडमधील रस्त्यांच्या समस्या आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या उद्देशाने गडकरींना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी मंत्रीांसमोर सहा मोठे रस्ते प्रकल्प मांडले आणि स्थानिक लोकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. चर्चेदरम्यान, नितीन गडकरींनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदात म्हटले, “यापूर्वी मी राहुल गांधींसोबत अमेठीच्या रस्त्यांबाबत चर्चा केली होती. priyanka-gandhi-meets-gadkari जर मी आता तुमचे काम केले नाही, तर लोक म्हणतील की मी भावासाठी काम केले, बहिणीसाठी नाही.” गडकरींच्या या भाषणावर प्रियांका गांधी आणि त्यांच्या सोबतच्या शिष्टमंडळात हस्स्याचे वातावरण पसरले. संसदेतील या गजबजाटात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील निरोगी संवादाचे हे एक सुंदर उदाहरण होते. गडकरींनी प्रियांका गांधींना स्पष्ट केले की सहा प्रकल्पांपैकी काही राज्य सरकारच्या अधिकारात आहेत, त्यामुळे केंद्र सरकार त्यावर थेट निर्णय घेऊ शकत नाही, मात्र केंद्राच्या अधिकारातील प्रकल्पांबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. त्यावेळी प्रियांका गांधींनी आत्मविश्वासाने उत्तर दिले, “जेव्हा आमचे सरकार केरळमध्ये सत्तेत येईल, तेव्हा आम्ही ते हाताळू.”
या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री गडकरींनी प्रियांका गांधींना आवाहन केले की काही खाल्याशिवाय निघू नका. priyanka-gandhi-meets-gadkari प्रत्यक्षात, गडकरींनी स्वतः यूट्यूबवर शिकलेली भाताची एक स्वादिष्ट डिश तयार केली होती आणि ती सर्वांसाठी सर्व्ह केली, जरी डिशचे नाव कोणालाच आठवले नाही. या भेटीमुळे संसदेतील औपचारिकता आणि राजकीय संवाद यामध्ये एक अनोखी मृदुता अनुभवायला मिळाली.
Powered By Sangraha 9.0