नागपूर,
Ravindra Nagar रवींद्र नगर येथील रवींद्र सभागृहात रविवार, १४ डिसेंबर रोजी ब्राह्मण सेवा मंडळ, नागपूर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेची सुरुवात “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने झाली. त्यानंतर मान्यवर अतिथी व कार्यकारिणी सदस्यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून सभेचा प्रारंभ केला.
मागील वर्षाचा सविस्तर गोषवारा मंडळाचे सचिव हेमंत पडळकर यांनी सादर केला.Ravindra Nagar त्यानंतर कोषाध्यक्ष आनंद बडे यांनी ऑडिट अहवाल सभेपुढे मांडला. येणाऱ्या वर्षातील विविध योजना, व्यवहार तसेच आय-व्ययाच्या नियोजनावर उपस्थित सदस्यांनी एकमुखी संमती दिली.
सौजन्य:दिनेश टेकाडे,संपर्क मित्र