माधव ज्ञानपीठ येथे सप्तशती संगम

18 Dec 2025 19:27:46
हिंगणघाट, 
madhav-gyanpeeth : स्थानिक माधव ज्ञानपीठ येथे विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान, विद्या भारती विदर्भ संलग्नित शाळा व्दारा सप्तशती कार्यक्रमाचे आयोजन गुरूवार ११ रोजी भास्कर भवनात करण्यात आले होते.
 
 
kl
 
प्रमुख अतिथी म्हणून सप्तशती कार्यक्रमाच्या संयोजक अर्चना जैनाबादकर, स्वाती भोळे, शिशुवाटीका प्रमुख निर्मला महाजन, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सुवणार्र् देशपांडे, संस्थेचे सहसचिव संजय देशपांडे तर प्रमुख वता म्हणून निवेदिता वझलवार उपस्थित होत्या.
 
 
निवेदीता वझलवार यांनी कुटुंब प्रबोधन व सामाजिक पर्यावरण ह्या विषयावर मार्गदर्शन केले. निर्मला महाजन यांनी भारताच्या विकासात महिलांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन केले. सुवर्णा देशपांडे यांनी बालकांच्या वाढीसाठी मातेने घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.
 
 
पालकांसाठी बुधवार १० रोजी रांगोळी व संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गुरूवार ११ रोजी पाककला व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत कीर्ती हांडे प्रथम तर दीक्षा बिसने यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
 
 
वेशभुषा स्पर्धेत प्रणाली गोमासकर प्रथम तर नेहा काळे यांनी द्वितीय, पाककला स्पर्धेत वर्षा नेवारे प्रथम तर सोनु बाभुळकर द्वितीय, संगीत खुर्ची स्पर्धेत गुंफा भोयर प्रथम, सविता मैत्रे यांनी द्वितीय क्रमांक
पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
Powered By Sangraha 9.0