सोनुर्ली येथे गोठ्याला आग; एक गाय व शेळीचा होरपळून मृत्यू

18 Dec 2025 20:27:15
तभा वृत्तसेवा
राळेगाव,
sonurli-cowshed-catches-fire : घरालगत असलेल्या गोठ्याला आग लागून घरातील जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम जळून राख झाल्या तर गोठ्यातील एक गाय व शेळीचा आगीत होळपळून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 17 डिसेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास वडकी पोलिस ठाणे हद्दीतील सोनुर्ली येथे घडली.
 
 
y18Dec-Aag
 
या आगीत राजू आनंद मते (सोनुर्ली) या शेतमजुराचे मोठे नुकसान झाले. राजू मते यांना घरकुल आल्याने त्यांनी आपल्या घराचे काम सुरू केले होते. बांधकाम सुरू असल्याने त्यांनी घराजवळ टिनपत्र्याच्या गोठ्यात राहण्याची व्यवस्था केली होती. बुधवारी रात्री मते परिवार घरी नसताना त्या टिनपत्र्याच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची माहिती त्यांना मिळाली.
 
 
आग प्रचंड वाढलयाने, घरात गॅस सिलेंडर असून घरात कोणी जाण्याचे धाडस केले नाही. आग इतकी भयंकर होती की, घराजवळील टिनपत्राच्या गोठ्यालाही आगीने आपल्या कवेत घेतले. गोठ्यात सुरेश उद्धव घोटेकर यांची एक गाय व शेळी जळून मृत्युमुखी पडली.
 
 
यावेळी गावकèयांनी धाडस दाखवत लगतच्या अशोक सूर यांच्या शेतातील मोटरपंपाद्वारे पाण्याने ही आग एक तासात आटोक्यात आणली. तोपर्यंत शेतमजूर राजू आनंद मते यांच्या घरातील सिलेंडरचा भयंकर स्फोट होऊन घरातील जीवनावश्यक वस्तू व घरकुलासाठी जमवलेली रक्कमही आगीत जळाली. पोलिस पाटील खरवडे यांनी घटनेची माहिती देताच वडकी पोलिस ठाणेदार सुखदेव भोरकडे, आकाश कुदुसे, अंकुश पाथोडे, चालक अमिर किनाके घटनास्थळी दाखल झाले.
 
 
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत राजू मते या शेतकèयाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सोबतच सुरेश घोटेकर यांचे गोधन जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची मागणी शेतमजूर व गोठा मालकाकडून प्रशासनाला करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0