नवी दिल्ली,
T20 World Cup 2026 tickets २० विश्वचषक २०२६ च्या सामन्यांसाठी तिकिटे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, यासाठी कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या व्यवस्थापनाने बंगाल क्रिकेट असोसिएशनने (CAB) किमती जाहीर केल्या आहेत. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या १० व्या हंगामातील ग्रुप स्टेज आणि नॉकआउट सामन्यांसाठी तिकिटे वेगवेगळ्या श्रेणीत उपलब्ध आहेत.
टी-२० विश्वचषक सामन्यांची काही तिकिटे केवळ १०० रुपयांना मिळणार आहेत, पण या किमतीत भारताचे सामने समाविष्ट नाहीत. उदाहरणार्थ, बांगलादेश विरुद्ध इटली, इंग्लंड विरुद्ध इटली आणि वेस्ट इंडिज विरुद्ध इटली यांसारख्या गट सामन्यांसाठी प्रीमियम हॉस्पिटॅलिटी (बी प्रीमियम) तिकिटांची किंमत ₹४,००० आहे, तर लोअर ब्लॉक्स बी आणि एल प्रत्येकी ₹१,०००, लोअर ब्लॉक्स सी, एफ आणि के तसेच डी, ई, जी, एच आणि जे प्रत्येकी ₹२०० आहेत. अप्पर ब्लॉक्स बी१, सी१, डी१, एफ१, जी१, एच१, के१ आणि एल१ साठी तिकिटांची किंमत ₹१०० आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांसारख्या गट सामन्यांसाठी तिकिटे किंचित महाग आहेत. प्रीमियम हॉस्पिटॅलिटी (बी प्रीमियम) तिकिटे ₹५,०००, लोअर ब्लॉक्स बी आणि एल ₹१,५००, लोअर ब्लॉक्स सी, एफ आणि के ₹१,०००, डी, ई, जी, एच आणि जे ₹५०० आणि अप्पर ब्लॉक्स बी१, सी१, डी१, एफ१, जी१, एच१, के१ आणि एल१ ₹३०० किमतीत उपलब्ध आहेत. ईडन गार्डन्स येथे होणाऱ्या सुपर एट सामने आणि सेमीफायनलसाठी प्रीमियम हॉस्पिटॅलिटी (बी प्रीमियम) तिकिटे ₹१०,००० मध्ये मिळतील, लोअर ब्लॉक्स बी आणि एल ₹३,०००, लोअर ब्लॉक्स सी, एफ आणि के ₹२,५००, डी, ई, जी, एच आणि जे ₹१,५००, तर अप्पर ब्लॉक्स बी१, सी१, डी१, एफ१, जी१, एच१, के१ आणि एल१ ₹९०० मध्ये उपलब्ध आहेत. यंदा लीग टप्प्यात टीम इंडिया ईडन गार्डन्सवर कोणतेही सामने खेळणार नाही.